vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनीउपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनीउपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी कुंभमेळाच्या पार्श्वभुमिवर वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरात विविध विकासकामे राबवावयाची आहेत. या सर्व विभागांनी आपल्या विभागामार्फत करावयाच्या विकासकामांसंदर्भात उपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले

वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, पुरातत्व विभागाचे शिवकुमार भगत, पोलीस निरीक्षक डी. आर. फराटे आदी उपस्थित होते.

कुंभमेळ्यानिमित्त प्रत्यक्ष पर्वणी सुरु होण्याच्या आत नियोजीत विकास आराखड्यानुसार कामे सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून सर्व संबंधित विभागांनी उपाययोजना राबविण्यास सुरुवात करावी. त्यात मंदिर परिसरातील अतिक्रमणे काढण्याबाबत ग्रामपंचायतमार्फत उपाययोजना व्हाव्या. त्यासाठी महसूल, पोलीस व पुरातत्व विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात यावी. त्यासाठी संबंधित अतिक्रमणधारकांशी स्थानिक प्रशासनाने बोलावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

पूरसदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात 129 कुटुंबातील 361 नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर**वाहतूकीवर परिणाम होणारे रस्ते बंद**नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन*

औरंगाबाद विभागातील पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करावी

जलसंपदा विभागाचा ‘रिपोर्ट कार्ड’ मुख्यमंत्र्यांना सादर अहवाल देणारे विखे पाटील ठरले पहिले मंत्री

पंतप्रधान मोदी भोपाळमध्ये विकास परिषदेचे उद्घाटन करणार

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशातील पहिला सृजनशील, सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव मुंबईत;२१ जून रोजी आशा रेडिओ पुरस्काराचे वितरण- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा

vishwatmaklokswamivarta