vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतसहभागी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अनिवार्य..

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतसहभागी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अनिवार्य..

ठाणे, प्रतिनिधी:- पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना दि.12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कोकण विभागात भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी व युनिव्हरसल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत मृग बहार सन 2024 मध्ये चिकू, फळपिकासाठी तर आंबिया बहार सन 2024-25 मध्ये काजू, केळी व आंबा या फळपिकांसाठी फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे, परंतू फळपिकांची ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपद्वारे केलेली नाही त्यांनी दि.25 एप्रिल 2025 पर्यंत ई-पीक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा दि.12 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार 7/12 उताऱ्यावर ई-पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही.

याबाबतीत सविस्तर माहितीचा दि.12 जून 2024 चा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तरी फळपीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी दि.25 एप्रिल 2025 पर्यंत डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक बालाजी ताटे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रिपेड टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचे नवे भाडेदर जाहीर…

vishwatmaklokswamivarta

रुग्णवाहिका चालक-मालकांनी रुग्णवाहिकेचे दरपत्रक,रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे बंधनकारक..

vishwatmaklokswamivarta

लोणार नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीरा मापारी विजयी

vishwatmaklokswamivarta

अवैध सावकारी पिळवणूकीच्या त्रासाच्या अनुषंगाने पिडीतांनी संपर्क साधण्याचे आवाहन

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार..

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा