vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांना अटक

ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, ६ जणांना अटक

ठाणे, प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली २७ मे २०२६ रोजी एक मोठी विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अनेक अन्न व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी विविध अन्न आस्थापनांची तपासणी करून ७ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा संशयास्पद साठा जप्त केला आहे. यामध्ये १,४९,७२४ रुपयांचे खाद्यतेल, ९३,८३० रुपयांचे फरसाण, २,०६,८०० रुपयांचे तूप, ८,१९० रुपयांचे हक्का नुडल्स, १७,१०० रुपयांची ताडी, ५४,०९६ रुपयांचे शरबत आणि १,९७,६४० रुपये किंमतीच्या डिंकाचा (गम अरेबिक) समावेश आहे. याशिवाय, याच दिवशी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून ४,५३,३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे कडक आवाहन केले आहे. नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा किंवा वागळे इस्टेट, ठाणे येथील सह आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कडक कारवाई यापुढेही नियमितपणे सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

0000

संबंधित पोस्ट

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार 

नव्या मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जाताना स्वच्छता अधिकारी, कर्मचारी यांची क्षमतावृध्दी कार्यशाळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

गोविंदनगर येथील वै. ह.भ.प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांचा 6 वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पडला पार… 🎊🙇🏻‍♂️

धर्माबाद नगरपरिषद निवडणूक;इनानी मंगल कार्यालयातील प्रकाराची प्रशासनाकडून तात्काळ दखल…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष. जिल्हाभरात 682 अधिकारी, 288 लोकप्रतिनिधींनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत. पहिल्या दिवशी जिल्हाभरात 16 हजार 647 मुले शाळेत दाखल. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी 

निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – नवी मुंबई अंतर्गत शाळाप्रमुखांना अंतिम इशारा