vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन

23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन..

खेळ प्रतिनिधी
व्हिएतनाममधील दा नांग इथल्या 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.​भारताच्या पुरुषांच्या फ्रीस्टाईल आणि महिलांच्या कुस्ती संघाने या अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती संघाने 4 सुवर्णपदकांसह 9 पदके जिंकली असून, 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात एकूण पदकसंख्येच्या बाबतीत भारताची ही आत्तापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.​महिला कुस्ती संघाने देखील 6 सुवर्णपदकांसह 10 पदके जिंकली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
​ग्रीको-रोमन संघाने देखील 8 पदकांसह आत्तापर्यंतची आपली सर्वोच्च कामगिरी नोंदवल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला आहे.या यशाबद्दल त्यांनी ​कुस्तीपटूंचे अभिनंदन केले, तसेच त्यांना भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छाही दिल्या आहे.यासंदर्भात पंतप्रधानांनी ​ X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदे
आपल्या कुस्तीपटूंची उत्कृष्ट कामगिरी!व्हिएतनाममधील दा नांग इथे पार पडलेल्या 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये आपल्या पुरुषांच्या फ्रीस्टाईल आणि महिलांच्या कुस्ती संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.
पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती संघाने 4 सुवर्णपदकांसह 9 पदके पटकावली असून, 23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात एकूण पदकसंख्येच्या बाबतीत भारताची ही आत्तापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. महिला कुस्ती संघानेही 6 सुवर्णपदकांसह 10 पदके जिंकली. ग्रीको रोमन संघाने देखील 8 पदकांसह एकूण पदकसंख्येच्या बाबतीत आपली आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी नोंदवली.आपल्या कुस्तीपटूंचे अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.

संबंधित पोस्ट

भारतीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची स्टॉकहोममध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठक

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प- व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड

बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष निवडणूक तपासणी  मोहिमेत मतदार पडताळणी दरम्यान नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार येथील काही व्यक्ती सापडल्या आहेत.१ ते ३० ऑगस्ट दरम्यान सखोल चौकशी होणार असून, अयोग्य आढळलेल्या नावांना ३० सप्टेंबरला अंतिम यादीतून वगळण्यात येईल.

विशेष लेख- कोल्हापूर चित्रनगरी विकासाच्या वाटेवर-