vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वीप उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हस्तकला, रांगोळी प्रदर्शनातून दिला मतदानाचा संदेश…

स्वीप उपक्रमात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हस्तकला, रांगोळी प्रदर्शनातून दिला मतदानाचा संदेश…

 

        नवी मुंबई प्रतिनिधी ‘ नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता नागरिकांमध्ये मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक प्रमाणात मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अंतभाव करण्यात आलेला आहे.

   स्वीप कार्यक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध प्रकारचे मतदान जागृती उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुणांना उत्तेजन मिळावे व त्या माध्यमातून निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश प्रसारित व्हावा अशाप्रकारे अभिनव उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.

     कोपरखैरणे से.7 येथील नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा क्र.31 नेहमीच वेगळया प्रकारचे कार्यक्रम कल्पकतेने आयोजित करीत असल्यामुळे सांस्कृतिक उपक्रमांची जपणूक करणारी शाळा म्हणून ओळखली जाते. 15 जानेवारी 2026 रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद यांनी हस्तकला व रांगोळी कलेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

     या हस्तकला प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत वेगवेगळया प्रकारच्या वस्तू निर्माण केल्या तसेच कागदी पिशव्या, पतंग अशा टाकाउुपासून टिकाउु वस्तूंवर व त्याठिकाणी काढलेलया आकर्षक रांगोळीवर मतदानाचे आवाहन करणारे संदेश चितारुन मतदानाविषयी जनजागृतीही केली. शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे व निवडणूक विषयक स्वीप कार्यक्रमाचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे यांनी पुढाकार घेत शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांसह हा उपक्रम यशस्वी केला.

       विशेष म्हणजे यावेळी 9-10 चे 230 विद्यार्थी आणि इयत्ता 8 वीचे 110 विद्यार्थी यांनी शाळेच्या परिसरात मतदान जागृती विषयी रॅली काढून 100 टक्के मतदानाचे आवाहन केले. ‘मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो’, ‘प्रत्येक मतदार – लोकशाहीचा आधार’, ‘जबाबदारीने करा मतदान – राखा संविधानाचा सन्मान’ अशा विविध घोषणा देत व घोषणांचे फलक उंचावत काढलेल्या मतदान जागृती रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी मार्केट क्षेत्रात जाऊन तेथील दुकानदार व ग्राहक तसेच रस्त्यावरील नागरिक यांच्यामध्येही मतदान विषयक जागृती करण्यात आली.

000

संबंधित पोस्ट

गॅस, इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

सायन कोळीवाडा येथील हार्बर रेल्वे लाईन गुरु तेग बहादुर स्टेशन फूटबोर्ड व लिफ्ट समस्या ज्येष्ठ नागरिक हैराण…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे आजारांचे पुनर्विलोकन, अर्थसहाय्याची नव्याने निश्चिती, रुग्णालय संलग्नीकरण निकष ठरविण्याकरिता समिती

vishwatmaklokswamivarta

अवैधरित्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 121 वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 व शालेय स्कूल बस नियमावली 2011 नुसार थेट कारवाई*

vishwatmaklokswamivarta