vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नमुंमपा निवडणूक निर्णय अधिकारी यांना धमकावणे ही गंभीर बाब – पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नमुंमपा निवडणूक निर्णय अधिकारी यांना धमकावणे ही गंभीर बाब – पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ही 15 जानेवारी 2026 रोजी संपन्न होत असून निवडणूक विषयक कामकाज पारदर्शक पध्दतीने आठही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये सुरु आहे. यामध्ये घणसोली निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीम. कल्पना गोडे ह्या निवडणूक विषयक कर्तव्य बजावत असतांना त्यांना एका व्यक्तीकडून निवडणूक प्रक्रियेत बेकायदेशीर हस्तक्षेप, दबाव व धमकी आणि त्यांची बदनामी करण्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला आहे. हे कृत्य निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेचा (Model Code of Conduct) भंग असून निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता, पारदर्शकता आणि पवित्रता धोक्यात आणणारी बाब आहे.

           सदर प्रकरणाच्या प्राथमिक तपासात संबधित व्यक्तीने थेट निवडणूक कामकाजात दबाव टाकणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या खाजगी भ्रमणध्वनी / व्हॉट्स ॲपवर संपर्क साधून धमकी देणे तसेच त्यांच्याबाबत व्देषपूर्ण व बदनामीकारक मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित करणे असे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

          या संदर्भात, घणसोली विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित व्यक्तीविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाची कायदेशीररित्या पुढील चौकशी सुरू आहे.

          सदर प्रकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने स्पष्टपणे नमूद करण्यात येत आहे की, नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने सुरु आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा कोणत्याही निवडणूक कर्मचाऱ्यावर दबाव, धमकी, बदनामी अथवा कामकाजात हस्तक्षेप केल्यास कोणतीही सूट दिली जाणार नाही आणि अशा प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

          निवडणूक प्रक्रिया ही घटनात्मक जबाबदारी असून तिच्या अंमलबजावणीदरम्यान कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य व गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने सर्व नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, कायद्याचे पालन करून निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने व शांततेने पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे.

000

संबंधित पोस्ट

जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेले श्री. ऋषिकेशदादा कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ खरोळा गावामध्ये प्रचार रॅलीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी: पश्चिम बंगालमध्ये नव्या पर्वाची सुरुवात! शुभेंदु अधिकारी यांची भाजप विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड; राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून होणार नियुक्ती 

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा-शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेऊन शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावीसाठी कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

१८ लाख लोकांपर्यंत स्मरणिका पोहचणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले साहित्य संमेलनाच्या अटेकेपार डिजीटल स्मरणिकेचे प्रकाशन

⛈️🚨भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला .पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना उद्या, सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. 

महानगर प्रदेशात महिलांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी अभिनव प्रकल्पाचा प्रस्ताव-छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधिकरणास अर्बन रिसर्च फाउंडेशन–सेफटीपिन यांचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta