vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ७५ वर्षांनिमित्तया महापूजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष महापूजा याच पार्श्वभूमीवर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महापूजा संपन्न

गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ७५ वर्षांनिमित्तया महापूजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष महापूजा याच पार्श्वभूमीवर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते महापूजा संपन्न

📍 मुंबई प्रतिनिधी-गुजरातमधील #सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीच्या ७५ वर्षांनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रभास पाटण येथे विशेष महापूजा पार पडली. या पार्श्वभूमीवर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्ष हा विशेष कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागामार्फत श्री धाकलेश्वर महादेव मंदिर, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

सोमनाथ मंदिर भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्य अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही ते आजही दिमाखात उभे आहे, हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे. महमूद गझनीपासून औरंगजेबापर्यंत अनेक परकीय आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र मंदिराचे अस्तित्व आणि त्यामागील श्रद्धा कधीही नष्ट होऊ शकली नाही. भारत केवळ भौगोलिक देश नसून तर तो एक चिरंतन संस्कृती आहे. विविध मंदिरे, साधू-संत आणि #सनातन परंपरेमुळे भारताचा आत्मा आजही जिवंत आहे. ‘सनातन’ म्हणजे ज्याचा अंत नाही आणि सोमनाथ मंदिर हे त्याचे जिवंत उदाहरण आहे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

यावेळी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक भन्साळे यांनीही महादेवाचे दर्शन घेतले. यानंतर मान्यवरांनी ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ प्रदर्शनालाही भेट दिली

00000

संबंधित पोस्ट

गणपती बाप्पा मोरया !! जीएसबी सेवा मंडळाने मिळवले २०२५ च्या गणेशोत्सवासाठी ४७४.६४ कोटी रुपयांचा विमा…

vishwatmaklokswamivarta

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे अभिवादन

मनोज जरांगे पाटील यांच्यावर मध्यरात्री सलाईनद्वारे उपचार; प्रकृती स्थिर – जिल्हा प्रशासनाची माहिती

vishwatmaklokswamivarta

पैठणमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांचा जिल्हास्तरीय भव्य विक्री महोत्सव-महीला बचत गटांना एक कोटी कर्जाचे वितरण

मार्डी येथे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मुक्कामी दौरा महिलांच्या हॉलचा प्रश्न जागेवरच निकालीअवैध दारू विक्रीवर कडक कारवाईचे निर्देश

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’साठी प्रकल्प विकासकांना आवश्यक परवानग्या ऑनलाईन देण्यात याव्यात. हा प्रकल्प राबविताना येणाऱ्या समस्या जिल्हा, गाव, मंत्रालयस्तरावर सोडवा. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण, कार्यान्वित होण्याकडे सर्वांनी जबाबदारीपूर्वक पाहावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

vishwatmaklokswamivarta