vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पैठणमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांचा जिल्हास्तरीय भव्य विक्री महोत्सव-महीला बचत गटांना एक कोटी कर्जाचे वितरण

पैठणमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांचा जिल्हास्तरीय भव्य विक्री महोत्सव-महीला बचत गटांना एक कोटी कर्जाचे वितरण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने पैठण येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे चार दिवसीय जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन आ. विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी आ. भुमरे यांच्या हस्ते पैठण तालुक्यातील महिला बचत गटांना ५० लाख रुपये तसेच जिल्ह्यातील इतर दतालुक्यांतील बचत गटांना ५० लाख रुपये असे एकूण १ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात बचत गटातील महिलांना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहकार्य करणाऱ्या २२ पुरुषांचा “पुरुष सन्मान सुधारक” पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी आ.भुमरे यांनी पैठण येथील बचत गटांसाठी लोकसंचालित साधन केंद्राकरिता हॉल, कार्यालय व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सहकार्य करण्याचेही त्यांनी सांगितले.

शिवाजी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे,माजी नगराध्यक्ष भूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, पंचायत समिती सभापती वैशाली विनोद बोंबले, उपसभापती संजय लगाने, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग औटे, नगरसेवक जितू परदेशी, प्रशांत जगदाळे, ज्योती काकडे, मनोज गायके, जिल्हा कृषी अधिकारी देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, नाबार्डचे महाव्यवस्थापक सुरेश पटवेकर, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पठाडे आदींची उपस्थिती होती.जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळाव्यास पैठण तालुका व जिल्ह्यातील सुमारे ७५० महिला उपस्थित होत्या.

प्रास्ताविक चंदनसिंग राठोड यांनी केले. सूत्रसंचालन सुनीता सहाणे यांनी तर आभार सुनील पैठणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लोकसंचालित साधन केंद्र व जिल्हा टीमने विशेष परिश्रम घेतले.

00000

संबंधित पोस्ट

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय-विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

vishwatmaklokswamivarta

सिपेटच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात..

vishwatmaklokswamivarta

विनानंबर हायवांवर जिल्हाधिकाऱ्यांची अचानक धडक #कारवाई,हायवांवर आरटीओकडून ७३ हजार ७५० रुपयांचा दंड ; चालक-मालकांना कडक इशारा#रेती, #मुरुम, मातीची #वाहतूक विनानंबर हायवांद्वारे केल्यास कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्थांनी तंबाखुमुक्तीसाठी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी…