vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संविधान बंगल्याचे उद्घाटन*नविन बांधलेल्या संविधान बंगल्याच्या गृहप्रवेश सोहळयात केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अनेक मान्यवरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव*   

केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संविधान बंगल्याचे उद्घाटन*नविन बांधलेल्या संविधान बंगल्याच्या गृहप्रवेश सोहळयात केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अनेक मान्यवरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव*

मुंबई प्रतिनिधी – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या बांद्रा पूर्व येथील नव्याने बांधण्यात आलेल्या संविधान या बंगल्यातील गृहप्रवेश सोहळा नुकताच रविवार दि. 10 मे 2026 रोजी मोठया उत्साहात पार पडला. नव्याने बांधण्यात आलेल्या संविधान बंगल्याचे उद्घाटन आणि गृहप्रवेश सोहळा मोठया उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हर्षउल्हासात साजरा करण्यात आला. महाकारुणिक भगवान गौतम बुध्द आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमा पुजन बौध्द धम्म पध्दतीने बुध्द वंदना घेवुन संविधान या नविन वास्तुचे उद्घाटन आणि गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी देशभरातुन रिपब्लिकन पक्षाचे मान्यंवर कार्यकर्ते आणि राज्यातील अनेक मान्यंवर लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहुन ना. रामदास आठवले यांना नविन गृहप्रवेशानिमीत्त शुभेच्छा दिल्या.

 केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या संविधान बंगल्याच्या गृहप्रवेश उत्सवास पुज्य भदंत डॉ. राहुलबोधी महाथेरो, पुज्य भंते व्हीरत्नथेरो महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्राचे समाज कल्याण कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आमदार अमित साटम, खासदार वर्षाताई गायकवाड, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार संजय उपाध्याय, आमदार मनिषाताई चौधरी, आमदार दिलीप मामा लांडे, आमदार राजेश पवार, रिपब्लिकन नेते राजेंद्र गवई, माजी खासदार राहुल शेवाळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविंद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरु डॉ. अजय भामरे, आय.आर.एस. अधिकारी समीर वानखेडे, भाजप पदाधिकारी आसिफ भामला; रिपब्लिकन पक्षाचे संजय सिन्हा (उत्तरप्रदेश), ब्रम्हानंद रेड्डी (आंध्रप्रदेश), रवि कुंडली (हरियाणा) गोरख सिंग, रत्ना प्रसाद, रोजा राणी (तेलंगाना) काकासाहेब खंबाळकर, गौतम सोनवणे, एम.एस. नंदा, सिध्दार्थ कासारे, प्रकाश जाधव, राहुल सोनावले;घनश्याम चिरणकर, सोहेल शेख, सचिनभाई मोहीते, दयाल बहादुरे, बी.के. बर्वे, चंद्रशेखर कांबळे, उषाताई रामलु, अभयाताई सोनवणे, किशोर मासुम, देवेंद्र रणपिसे आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे असे असे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार अजित पवार आपल्या x सोशल मीडिया अकाउंट वर म्हटले आहे

सायन कोळीवाडा जी. टी. बी. रेल्वे स्टेशन लटकत्या जाहिरात फलकावर कारवाई मागणी -रेल्वे प्रवासी

धारावी पोलीस ठाणे नवनिर्वाचित श्री सोयस्कर यांची बीट पंचायत समिती घेतली सदिच्छा भेट

ई-पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 61.79% ई पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी -डीसीएस ॲपव्दारे करा नोंदणीØ तलाठी, कोतवाल, सहायक शेतकऱ्यांच्या मदतीलाØ सातबारावर पीक नोंदणी आवश्यक

vishwatmaklokswamivarta

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरणबाबत शासन निर्णयात सुधारणा पात्र प्रकल्पग्रस्तांना होणार निर्णयाचा लाभ- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीयांच्या स्वयंरोजगार,उद्योग आणि उच्च शिक्षणाला आर्थिक बळ