vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात” 347 उमेदवारांची प्राथमिक निवड

“पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात” 347 उमेदवारांची प्राथमिक निवड

 अमरावती, प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन अमरावती विद्यापीठ परिसर येथे 18 ऑगस्ट रोजी आयोजित ‘पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या व बँकांनी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे एकूण 347 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

   संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती विद्यार्थी विकास विभाग,कौशल्य विकास विभागीय आयुक्तालय अमरावती आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून 721 उमेदवारांनी नोंदणी केली. यातील 562 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. आदित्य अनधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., अभिनंदन को-ऑपरेटिव्ह बँक लि., जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लि., महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स प्रा. लि., क्रेडिट एक्सेस ग्रामीण लि. आणि श्रीराम फायनान्स लि. या सहा कंपनी व बँकांच्या प्रतिनिधींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून विविध पदांसाठी 347 उमेदवरांची प्राथमिक निवड केली आहे.

   विभागीय रोजगार मेळावा समन्वयक समितेचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.महेंद्र ढोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कृषी विभागाचे सहसंचालक गणेश घोरपडे, जिल्हा स्तरीय रोजगार मेळावा समन्वय समितीचे अध्यक्ष भूषण काळमेघ आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब मोगले यांनी केले तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आभार मानले.

00000

संबंधित पोस्ट

आशियाखंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागातील गणेशोत्सवाच्या मंडळाच्या गणपती बाप्पाच्या सुंदर मुर्त्या गणेश भक्तांच्या दर्शनाकरिता..

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ निमित्त शपथविधी कार्यक्रम उत्साहात“आपली सेवा, आमचे कर्तव्य” संकल्पाने पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार

जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान….

सामान्य विद्यार्थ्यालाही सैनिकी शाळांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक निर्णय घेणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस