vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

22 ऑगस्ट रोजी परतवाडा येथे “पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी

22 ऑगस्ट रोजी परतवाडा येथे “पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा”थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी

 अमरावती, प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडल करिअर सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ऑगस्ट 2026 रोजी परतवाडा येथील कोर्ट रोड स्थित कल्याण मंडपम मध्ये ‘पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

    जिल्ह्यातील जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित या रोजगार मेळाव्यात वेगवेगळया पात्रतेसाठी महिंद्रा अँड महिंद्रा प्रा.ली.नागपूर, जाधव गियर्स ली.अमरावती,वैभव एन्टरप्राईजेस प्रा.लि.नागपूर,जाबील सर्किट इंडिया प्रा.लि. पुणे, नवभारत फर्टिलायझर प्रा.लि. नागपूर, बीव्हीजी पुणे, कोअर प्रोजेक्ट इंजिनियर अमरावती,धूत ट्रान्समिशन प्रा.लि., श्रीराम फायनान्स, ब्लिंकिट,कृपा कन्सल्टनसी पुणे, प्रिसिजन मॅपिंग सोल्युशन अमरावती यांच्याकडून थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत गट विकास अधिकारी ,पंचायत समिती अचलपूर,नगरपरिषद अचलपूर,सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर,शासकीय तंत्रनिकेतन अचलपूर आदी कार्यालयांचे प्रतिनिधी प्रतिनिधी वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरिता उपस्थित सुशिक्षित तरुणांची मुलाखत घेऊन निवड करणार आहेत. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरी व प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

     युवक युवतींसाठी रोजगाराची ही उत्तम संधी असून जास्तीत-जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. उमेदवारांना कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066/7620 560 125/8308956236 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे असे सांगण्यात आले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

अमरावती विभागात 200 तरुणांना ‘टूरिस्ट गाइड’ बनण्याची संधी;पर्यटन संचालनालयातर्फे 7 दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण

चारचाकी वाहनासाठी एमएच-50 ए ए मालिका सुरु शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा

भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक करार- कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न..

बीआयएस’च्यावतीने मुंबईत जागतिक मानक दिनानिमित्त ‘मानक महोत्सव’ साजरा

vishwatmaklokswamivarta

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम अंतर्गत राज्यस्तरावर जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रथम क्रमांकावर