vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहनलाभार्थ्यांचा लाभ डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार..

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहनलाभार्थ्यांचा लाभ डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार..

बुलडाणा, प्रतिनिधी: संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत एकुण 2 लक्ष 34 हजार 398 लाभार्थी आहेत. त्यापैकी राज्य शासनाचे संजय गांधी व श्रावणबाळ योजनेअंतर्गत 1 लक्ष 81 हजार 1 लाभार्थी आहेत. तर केंद्र शासनाचे इंदिरा गांधी विधवा, दिव्यांग, वृद्धापकाळ योजनेचे 53 हजार 397 लाभार्थी आहेत. या दोन्ही योजनाच्या लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासुन डिबीटीद्वारे अनुदान वाटप होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे जिल्ह्यातील 2 लक्ष 34 हजार 398 लाभार्थ्यांपैकी 64 हजार 266 लाभार्थ्यांच्या खात्यात माहे जानेवारी 2025 या महिन्याची अनुदान रक्कम (प्रत्येक मासिक 1500 रुपये) जमा झालेली नाही. ज्या लाभार्थींना अनुदानाची रक्क्म बँक खात्यात जमा झालेली नाही, त्यांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.

लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड व बँक पासबुक संजय गांधी शाखा तहसिल कार्यालय, सबंधित गावचे तलाठी अथवा कोतवाल यांच्याकडे जमा करावे किंवा तहसील कार्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या अग्रीस्टॅक, विविध प्रमाणपत्र वाटप शिबिर ठिकाणी जमा करावे.(यापुर्वी जमा केले असल्यास परत जमा करण्याची आवश्यकता नाही), लाभार्थ्यांनी आधार सेवा केंद्राद्वारे आपले आधार अद्यावत असल्याची खात्री करावी. आधार अद्यावत नसल्यास ते अद्यावत करुन घ्यावे. डिबीटी प्रणलीद्वारे अर्थसहाय्य प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते व मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांनी बँक शाखेत जाऊन अथवा http://resident.uidai.gov.in/bankmapper या वेबसाईटवर आधार संलग्न (आधार सिडिंग) असल्याची खात्री करावी. आधार संलग्न नसल्यास आधार सिडींगचा फार्म बँकेत भरुन द्यावा, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे तहसिलदार यांनी दिली आहे.

00000

 

वृत्त क्रमांक : 197

संबंधित पोस्ट

अंबादास दानवे यांनी आमदार पदी निवड झाल्याबद्दल बदनापूर शिवसेनेच्या वतीने सत्कार

टीईटी पेपरफुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल; दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मदरशांचे ५० लाखांचे अनुदान थांबवून त्यांचे सामान्य शाळांत रूपांतर करा!- हिंदु जनजागृती समितीची राज्यशासनाकडे मागणी,उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मदरशांचे सर्वेक्षण करा; अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा 

आधी शेतरस्ते खुले केले, आता गरिबांच्या लेकरांच्या शाळा समृद्ध करणार!-जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरणासाठी सतीश घाटगे यांचा पुढाकार.

महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘सुलभ ‘चा महत्त्वपूर्ण पुढाकार भारतातील मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर व्यापक अहवाल प्रकाशित 

vishwatmaklokswamivarta

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावा