vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावा

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रीमंडळ बैठकीत आढावा

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

पाऊस चांगला झाला असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करुन ठेवा. गरज भासल्यास आणखी मागणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पीक पाणी, खते आणि बियाणे पुरवठा यांच्याबाबत कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, राज्यातील जवळपास सर्वच भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. यंदा आतापर्यंत ११.७० लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी १४५.८२ लाख हेक्टरवर अंतिम पेरण्या झाल्या होत्या. त्यातुलनेत यंदा सरासरी आठ टक्के पेरण्या झाल्या आहेत.खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत. राज्यातील काही भागात सतत पाऊस सुरू असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत असे त्यांनी सांगितले.अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली आणि धाराशिव जिल्ह्यात शंभर टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, जालना

आणि लातूर जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. पालघर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात २५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील भागात येत्या दोन ते चार दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे असे श्री. रस्तोगी यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व धरणाच्या जलाशयाच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे, असे जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले. कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी धरणात ५१५ मीटर पर्यंत पाणीसाठा करण्यात येईल असे सांगितल्याची माहिती श्री. कपूर यांनी यावेळी दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीपुर्वी अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

000

संबंधित पोस्ट

आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के सहभाग घेण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आस्थापनेवर ‘गट – क’ मधील सरळसेवा पदभरती..

vishwatmaklokswamivarta

हिंदूंमधील शौर्य व सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन !- डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती-रामराज्याच्या स्थापनेसाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ५०० ठिकाणी,तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतही ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम !

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

राज्यातल्या दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे क्रीडा विभागाला निर्देश.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय ऐतिहासिक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे पाठीराखे*

vishwatmaklokswamivarta