vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

      राज्याच्या कृषि उत्पादनात फलोत्पादन पिकांचा महत्वाचा वाटा आहे. फलोत्पादन पिकांचे मूल्यवर्धन / प्रक्रिया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पीके / त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शीतगृह तसेच नवीन तंत्रज्ञान राबविणे व शीतगृह आधुनिकीकरण प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या प्रकल्पाचे अर्थसहाय्य हे बँक कर्जाशी निगडीत असून बँक कर्जाच्या परताव्याच्या स्वरूपात अनुदान देय राहील.

   लाभार्थी पात्रता निकष – वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, भागीदारी संस्था, मालकी संस्था, नोंदणीकृत स्वयंसहायता गट, नोंदणीकृत उत्पादक संघ (ज्यामध्ये किमान 25 सदस्य असतील), शेतकरी उत्पादक कंपनी, महानगरपालिका, सहकारी संस्था, सहकारी मार्केटिंग फेडरेशन, लोकल बॉडी, कृषि उत्पन्न बाजार समिती, पणन मंडळ, शासकीय विभाग, ग्रामपंचायत.

       एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये शीतगृह तसेच नवीन तंत्रज्ञान राबविणे व शीतगृह आधुनिकीकरण या घटकांचे मापदंड सुधारित करण्यात आले आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000

 

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतजालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 11 प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती आदेशांचे वितरण

जालना येथे अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कोंकण भवनात संत रविदास महाराज यांच्या जयंतनिमित्त अभिवादन

vishwatmaklokswamivarta

महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या वन स्टॉप क्रायसिस सेंटर (सखी केंद्र) तसेच शासकीय महिला आधारगृहांमधील सेवांचा, सखी केंद्रे आणि महिला आधारगृहांमधील निवारा, कायदेशीर मदत, आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी मानधन योजनेच्यालाभासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करावा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे         

सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काममुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखलकरणार- पालकमंत्री शंभूराज देसाई