vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मिरा भाईंदर शहरातील महसूल विभागाशी सबंधित विविध विषयांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मिरा भाईंदर शहरातील महसूल विभागाशी सबंधित विविध विषयांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई, प्रतिनिधी : मिरा भाईंदर शहरातील महसूल विभागाशी सबंधित विविध विषयांवर मंत्रालयात बैठक घेतली जाईल यासंदर्भात आवश्यक परिपूर्ण माहिती सादर करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मिरा-भाईंदर शहरातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र मेहता, महसूल विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज, सहसचिव जायभाये उपस्थित होते. तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हे दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
भाईंदर येथील जुना सर्व्हे क्र. ६६३ (नवीन सर्वे क्र. २३७) या वर्ग-२ शासकीय जमिनीच्या संदर्भात सविस्तर आढावा घेताना मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, शासकीय जमिनीवरील अवैध व्यावसायिक वापर करून शर्तभंग व नियमभंगबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी सर्वे नंबरनिहाय माहिती सादर करावी.

 

00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी 11 सप्टेंबर रोजी संस्था स्तरीय फेरी

vishwatmaklokswamivarta

कोपरखैरणे परिसरात 1100 हून अधिक विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करीत दिला मतदानाचा संदेश*

जालना जिल्ह्यातील प्राचीन हस्तलिखितांचे होणार दस्तऐवजीकरण

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत ६ एप्रिल रोजी*

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या धारावी तालुकाप्रमुख दिलीप गाडेकर यांची निवड…

vishwatmaklokswamivarta