vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जी.सी. यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला. जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य यासह पर्यटन विकास या सारख्या क्षेत्रांवर भर देत सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण काम करु असे त्यांनी यावेळी सांगितले.

मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून विनय गौडा जी.सी. यांनी आपला पदभार आज स्विकारला. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नूतन जिल्हाधिकारी गौडा यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा श्रीमती संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी रोहयो रुपेश सिनगारे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नगरपालिका प्रशासन विभागाचे सह आयुक्त सौरभ जोशी, सहा. आयुक्त ऋषिकेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गौडा यांनी मनोदय व्यक्त केला की, छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटन विकासाला चालना देतांनाच शिक्षण, आरोग्य, जीवनोन्नती उपक्रम, रोजगारभिमुखतेला चालना देणे अशा विविध क्षेत्रात काम करुन जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यास आपण प्राधान्य देऊ, असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

श्री. दिलीप स्वामी यांनी या जिल्ह्यात काम करतांना आलेले अनुभव हे सुखद होते असे सांगितले. निवडणूकांचा कालावधी मोठा असतांनाही मोठ्याप्रमाणावर विकासाची कामे मार्गी लावता आलीत,याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बाल विवाह प्रतिबंध, प्रसवपूर्वगर्भलिंग तपासणी या बाबींवरही काम केले. प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर आपण भर दिला, असेही त्यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द

मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा

ठाणे जिल्ह्यात ‘Door Step Delivery’ उपक्रमांतर्गत नागरिकांना घरपोच शासकीय सेवा – मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे८० विभागांच्या तब्बल ४०२ सेवा आता नागरिकांच्या दारी

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी;आरोग्य सल्ला आरोग्य सांभाळण्यास प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 25 फायबर ग्लास बोटींचे लोकार्पण..

vishwatmaklokswamivarta

हर घर तिरंगा’ मोहीमेंतर्गत लोकसहभागातून होणार विविध उपक्रमांचे आयोजन