vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या धारावी तालुकाप्रमुख दिलीप गाडेकर यांची निवड…

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या धारावी तालुकाप्रमुख दिलीप गाडेकर यांची निवड…

मुंबई प्रतिनिधी-

 रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या चर्मकार समाजातील लढाऊ राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मुंबई धारावी तालुकाप्रमुख पदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप महादेव गाडेकर यांची दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी एका जाहीर कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष व लढाऊ नेतृत्व माजी आमदार श्री बाबुराव माने यांच्यासह मुंबई अध्यक्ष श्री विलास कोरेगावकर प्रदेशाध्यक्ष श्री रामभाऊ कदम नेते इंगोले साहेब व खिल्लारे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली दिनांक 26 रोजी राष्ट्रीय चर्मकार संघाची दिनदर्शिका प्रकाशन व कार्यकर्त्याचा मेळावा स्थळ डॉक्टर मनोज जोशी विद्यालय धारावी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी मुंबई नवी मुंबई सह इतर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना मा श्री बाबुराव माने साहेब यांच्यासह इतर वक्ते व नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी श्री माने म्हणाले की संपूर्ण चर्मकार समाज या संघटनेच्या छताखाली एकत्र येऊन दलित मागासवर्गीय चर्मकार यापैकी कुठल्याही घटकावर अन्याय अत्याचार झाल्यास कायदेशीर मार्गाने तुटून पडा न्याय मिळेपर्यंत संघर्ष करा ही संघटना घरोघरी गावोगावी खेड्यापाड्यात पोहोचवण्याची व आपल्या समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जबाबदारी आपण घेतली पाहिजे आपण शासनकर्ती जमात होण्यासाठी संघर्ष व लढा उभारावा लागेल असे मार्गदर्शन केले श्री गाडेकर यांची धारावी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वांनी कौतुक व अभिनंदन केले अशी माहिती संघाकडून देण्यात आली

0000

संबंधित पोस्ट

नमुंमपामार्फत 27 मार्च रोजी प्रसिध्द पदभरती जाहिरातीतील पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची मुदत आता 19 मे 2025 पर्यंत..

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे –प्रधान सचिव श्रीकर परदेशी*‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज** वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन*

विधानसभा लक्षवेधी :माथाडी कामगार बोगस नोंदणी तपासणीसाठी विशेष मोहीम- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

खंडाळा तालुक्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा छाननीबाबत खुलासा

vishwatmaklokswamivarta