vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

 सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील सांगली –मिरज शहरासह ग्रामीण भागातील विविध बँकांमध्ये 176 कोटी रुपये बचत, चालू व मुदत ठेव स्वरुपात ठेवलेले 7,75,315 इतके खातेदार 10 वर्षे पुन्हा बँकेकडे फिरकले नसल्याने ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली आहे. अशा मयतांचे वारस किंवा जिवंत असलेल्या खातेदारांनी 31 डिसेंबरपर्यंत संबंधित बँकेशी संपर्क करायचा आहे. ज्या बँकेत आपले खाते आहे तेथे कागदपत्रे सादर करून आपली रक्कम काढून घ्यावी. रिझर्व बँकेने यासाठी दिलेल्या तीन महिन्याच्या मुदतीत बँकेला कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

रिझर्व्ह बँकेत पैसे जमा…

 रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे खातेदाराने बचत, चालू व मुदत ठेव अशा स्वरूपातील 10 वर्षांत खात्यावर कुठलाही व्यवहार केला नसेल तर ती रक्कम संबंधित बँकेने रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) जमा करावी लागते, अशी रक्कम मागणी करण्याचा अधिकार खातेदार किंवा मयत खातेदाराच्या वारसाला आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने खातेदारांना संबंधित बँकेशी संपर्क करून आपली रक्कम मागणी करण्यास तीन महिन्यांचा अवधी दिला आहे.

 यामध्ये सर्वाधिक रक्कम ही सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 3,72,838 खातेदारांची 75.72 कोटी रुपये इतकी रक्कम आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या 1,61,918 खातेदारांचे 33.54 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 44,939 खातेदारांचे 16.99 कोटी, आय सी आय सी आय बँकेच्या 96,917 खात्यावर 16.15 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 1,616 खात्यावर 8.77 कोटी, युनियन बैंक ऑफ इंडियाच्या 30,075 खात्यावर 7.65 कोटी, रत्नाकर बँकेच्या 24,968 खात्यावर 5.80 कोटी तसेच इतर बँकांनीही रक्कम रिझर्व्ह बँकेकडे वर्ग केली आहे

जनजागृती मोहीम , केंद्र सरकारच्या वित्त विभाग व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत जिल्हा अग्रणी बँक यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

 बँकामध्ये बचत खाते, चालू खाते व ठेव स्वरूपात असलेल्या 10 वर्षापेक्षा जास्त काळ दावा न केलेल्या म्हणजेच अनेक खातेदार खात्यावर असलेल्या रकमा काढण्यासाठी ते बँकेकडे फिरकले नाहीत. अशा स्वरूपातील रकमा परत मिळवण्यासाठीची जनजागृती व दावा मोहीम चालू आहे. यासाठीची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारच्या वित्त विभाग व राज्यस्तरीय बँकर्स समितीने बँकांना दिलेले आहेत. त्याच्या अधीन राहून या मोहिमेअंतर्गत खातेदारांना त्यांच्या खात्यावरील रक्कम काढून घेता येईल अथवा पुढे नुतनीकरण करून ठेवताही येतील. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी/ वारसांनी आपल्या बँकेच्या शाखेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत KYC सादर करणे आवश्यक आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी आयोजित केल्या जाणार असून, खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मंत्रालयात पत्रकारांना मज्जाव – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून तीव्र निषेध! पत्रकारांना थांबवणं म्हणजे लोकशाहीला गप्प करणं – संदीप काळे 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राने एक निर्भीड, कार्यक्षम आणि प्रशासनावर सखोल पकड असलेला कणखर नेता गमावला – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

काश्मीर मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यास रिपब्लिकन पक्ष सज्ज ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

विरेगाव ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी,पाच वर्षांचे विशेष लेखापरीक्षण करा; घरकुल-विहीर योजनांतील अनियमितता, सरपंच पदाच्या कथित अनधिकृत वापराची चौकशी करण्याची मागणी..