vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला व बाल विकास कार्यालयाकडून तयार केलेल्यानारीबलम पुस्तिकेचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते प्रकाशन

महिला व बाल विकास कार्यालयाकडून तयार केलेल्यानारीबलम पुस्तिकेचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते प्रकाशन

 सांगली, प्रतिनिधी : नवरात्रोत्सवामध्ये दिनांक 22 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेतून व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विकासाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या एकत्रिकरणाव्दारे जवळपास 27 हून अधिक योजना व लाभार्थी संख्या यावर आधारीत वृत्तमालिका व लेखमालिका प्रसारीत करण्यात आली होती. यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून संकलित करण्यात आली होती. त्या योजनांची माहिती देणाऱ्या ‘नारीबलम’ या पुस्तिकेचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते करण्यात आले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके, तहसिलदार लिना खरात यांच्यासह प्रांताधिकारी, तहसिलदार उपस्थित होते.

 महिला सक्षमीकरण हा सामाजिक व आर्थिक विकासाचा महत्वाचा घटक असून त्यासाठी विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या माझी सांगली, माझा अभिमान या अभिनव उपक्रमांतर्गत नारीबलम या पुस्तिकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत योजनांची माहिती पोहचविणे व योजनांचा लाभ देणे सुलभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

00000

संबंधित पोस्ट

त्‍या’ निर्णयाविरोधात विमाशि संघाचे धरणे आंदोलन१ फेब्रुवारी २०२५ रोजी बोर्ड कार्यालयासमोर निदर्शने

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

राज्य महोत्सव गणेशोत्सवाची व्यापकता राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या दणदणीत विजयाचा भाजपा जिल्हा जालना च्या वतीने फटाके फोडून विजयी जल्लोष !

vishwatmaklokswamivarta