vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य महोत्सव गणेशोत्सवाची व्यापकता राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण

राज्य महोत्सव गणेशोत्सवाची व्यापकता राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण

 

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राची परंपरा असेलल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून सामाजिक सौहार्द, कला संस्कृतीचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाची व्यापकता येत्या काळात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या राज्य व जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार महेश सावंत, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु.ल.देशपांडे अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, राज्यातील ऐतिहासिक बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोद्वारा जागतिक वारसा मानांकन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला शंभर वर्षांची प्रदिर्घ परंपरा लाभलेली आहे. आज देशविदेशात विविध ठिकाणी हा उत्सव उल्हासात साजरा केला जातो. सामजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लावणारा आणि लोककला, लोकसंस्कृती, लोकसंवाद यांना बळ देणारा गणेशोत्सव हा सर्वधर्मीय, सौहार्द जोपासणारा महत्त्वाचा उत्सव आहे. त्याची व्यापकता ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवण्याचा शासनाचा मानस असून यादृष्टीने देशातील विविध राज्यात तसेच विदेशांमध्येही विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या उत्सवात सक्रियपणे सहभागी होणाऱ्या गणेशमंडळांच्या कामांची दखल घेत नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या कामांना प्रोत्साहन देण्याच्या व्यापक उद्देशाने शासनाने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरापर्यंत असलेल्या स्पर्धां तालुकास्तरापर्यंत घेण्याचा निर्णय घेऊन यावर्षीपासून स्पर्धेत तालुकास्तराचा समावेश केला. या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने गणेशमंडळानी सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल तसेच सर्व विजेत्या मंडळांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी अभिनंदन केले.

संबंधित पोस्ट

अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निमित्त पाहेगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद” – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शन” 

शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

श्रीमती अंजली शर्मा, भाप्रसे यांनी स्वीकारला जालना महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार

स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 करिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज**सर्वेक्षणाच्या टुलकीटनुसार करावयाच्या कार्यवाहीचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सविस्तर आढावा*

vishwatmaklokswamivarta

शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करावेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जनतेला आवाहन,कायदा हातात घेणाऱ्यांवर, पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा…

उष्णतेच्या लाटेबाबत जिल्हा प्रशासनाचा इशारा