vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्पांतर्गत इंदोर येथे प्रशिक्षणासह अभ्यास दौरा संपन्न..

जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्पांतर्गत इंदोर येथे प्रशिक्षणासह अभ्यास दौरा संपन्न..

सातारा प्रतिनिधी: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प सातारा कार्यालयाने मुल्यसाखळी विकास शाळा (VCDS) अंतर्गत प्रशिक्षणासह अभ्यास दौरा इंदोर, मध्य प्रदेश येथे आयोजन करण्यात आला होता.

या प्रशिक्षणात सोयाबीन पिकाचे उत्पादन ते प्रक्रिया व पणन विषयक प्रशिक्षण घेण्यात आले. त्यामध्ये बियाणे प्रक्रिया कशा पद्धतीने करावी, बियाणे पेरणी कशी करावी, तणनाशक कसे व कधी वापरावे, कोणत्या खतांचा वापर कधी करावा, कीटकनाशक व बुरशी नाशक फवारणी कधी व किती करावी, पिकाला पाणी नियोजन कसे करावे, पिकाची मशागत कशा प्रकारे करावी, पीक काढणी कशी करावी, धान्य साठवणूक कशी करावी, धान्य विक्री व्यवस्थापन कसे करावे, प्राथमिक धान्य प्रक्रिया व द्वितीय धान्य प्रक्रिया संदर्भात भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थान इंदोर येथील अनुभवी शास्त्रज्ञ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

सोयाबीन बियाणा पासून प्रक्रिया करून दूध तयार करणेची पूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले, सोयाबीन दुधा पासून पनीर, श्रीखंड, ताक करण्याची पूर्ण प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवली. तसेच सोयाबीन बियाणा पासून प्रक्रिया करून सोयाबीन डाळ, पकोडे, शेव करणे ची पूर्ण प्रक्रिया प्रत्यक्षात करून दाखवली.
0000

संबंधित पोस्ट

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी 12 ओळखपत्रांना मान्यता कोणत्याही एका वैध ओळखपत्रावर मतदान करता येणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील मतदार गणना अर्जांचे 99.98 टक्के वितरण पूर्ण;डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात

पैठणला १००, पाचोडला ५० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला नवी बळकटी

vishwatmaklokswamivarta

आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गौरवदेशात लवकरच १००टक्के इथेनॉल इंधनावर वाहने धावणार पुणे सातारा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

चालू वर्षात जिल्हा नियोजनचा ७४४ कोटी रुपये निधी मंजूर**गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी – पालकमंत्री शंभूराज देसाई*