vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनाऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत 

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनाऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत

 

 सांगली, प्रतिनिधी: खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, उडीद व मूग खरेदीकरता शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी एनईएमएल )NemL पोर्टलवर 31 डिसेंबरअखेर ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील व संचालक मंडळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरिता महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रक्रिया राबविण्यात येते. केंद्र शासनाने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीकरिता प्रति क्विंटल सोयाबीन – 5328/- रूपये, मूग – 8768/- रूपये व उडीद 7800/- रूपये असे किमान आधारभूत दर निश्चित केले आहेत.

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेडमार्फत मूग, उडीद व सोयाबीन खरेदीकरिता शेतकरी नोंदणी दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया दिनांक 15 नोव्हेंबर 2025 पासुन सुरु करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात हंगाम 2025-26 मधील सोयाबीन खरेदी करिता विष्णुआण्णा खरेदी विक्री संघ, सांगली केंद्र (सांगली) व ॲड आर आर पाटील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, तासगाव केंद्र (तासगाव) ही खरेदी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.

शासनाने FAQ प्रतीच्या सोयाबीन साठी रु. 5328/- प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणीकरिता शेतकऱ्यांचा चालू (2025-26) हंगाम मधील ऑनलाईन सोयाबीन पीकपेऱ्याची नोंद असलेला ७/१२ उतारा, आधार कार्डची झेराक्स, बँक पासबुक आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन नोंदणी करुन घावी. नोंदणीकरिता शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित रहाणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांची FAQ मालाची खरेदी करण्यात येईल. खरेदी करिता SMS प्राप्त झाल्यानंतर शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेऊन यावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रसिध्दी पत्रकात करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

आज 2 सप्टेंबर विष्णुदास भावे नाट्यगृहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र आदरांजली

vishwatmaklokswamivarta

समस्त जनसमुदायाचा सदैव ऋणी राहील मी…महेंद्र गोडभरले*तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रेणापूर

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 8 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 102 प्रकरणे पात्र

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात 16 मेपासून घरयादी व घरगणना होणार- निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे- 14 जूनपर्यंत चालणार कार्यवाही – प्रगणकांना परिपूर्ण माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन