vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आज 2 सप्टेंबर विष्णुदास भावे नाट्यगृहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र आदरांजली

आज 2 सप्टेंबर विष्णुदास भावे नाट्यगृहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना विनम्र आदरांजली

      नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या वतीने बुधवार, दि. 02 सप्टेंबर, 2026 रोजी, सकाळी 10.00 वा. पासून विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी व त्यांनी प्रसारित केलेल्या समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाच्या विचारांव्दारे समाज प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष तथा सुप्रसिध्द साहित्यिक श्री.विश्वास पाटील अण्णा भाऊंच्या साहित्य आणि जीवनकार्यावर दुपारी 2.00 वा. व्याख्यान देणार असून सायं. 4 वा. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणा-या कर्मचा-यांचा व मातंग समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे

  तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या निमंत्रक समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीच्या सभापती श्री.रंजना सोनवणे व उपसभापती श्रीम.सुरेखा नरबागे यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

थंडी आणि अंधारापूर्वीच मतदानाचा हक्क बजावावा;ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांना निवडणूक अधिकारी अशीमा मित्तल यांचे आवाहन• हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन• 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 कालावधीत होणार मतदान• मतदार केंद्रापर्यंत जाण्यासाठी दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

vishwatmaklokswamivarta

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह; प्रवेश प्रक्रिया सुरु

पाणलोट यात्रेस गोळेगावपासुन सुरुवात

vishwatmaklokswamivarta

११० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाशिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

आपला पैसा आपला अधिकार योजनेचा लाभ घ्यावा- अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta