vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता-राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता-राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• पायाभूत सुविधा समिती बैठक संपन्न

मुंबई, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे. पुणे शहर परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महामार्गाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी महामार्गाचे जाळे विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावरील ० ते २६ किलोमीटर दरम्यान ४ पदरी उन्नत आणि ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गासह याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान पुढे २६ ते ४३ किलोमीटर लांबीमध्ये ४ पदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाईन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर) पद्धतीने सुधारणा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

 

बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित आदी उपस्थित होते.

बैठकीत सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी केले. बैठकीस सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, पावसाचा रेड अलर्ट जारी…

vishwatmaklokswamivarta

मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया कायद्यानुसार;नागरिकांना आक्षेप नोंदविण्याची संधी– राज्यमंत्री माधुरी मिसाळ

शासकीय मुकबधिर विद्यालय,विद्यानगर-अलिबाग येथे मोफत प्रवेश सुरू

लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरातील मराठी भाषा विभागातर्फे पुस्तक दालनाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहचविण्यासह देशाची एकता, अखंडता मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया – उपमुख्यमंत्री