vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरातील मराठी भाषा विभागातर्फे पुस्तक दालनाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरातील मराठी भाषा विभागातर्फे पुस्तक दालनाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी, प्रतिनिधी : येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरात मराठी भाषा विभागातर्फे ग्रंथ भेट देऊन उभारण्यात आलेल्या पुस्तक दालनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.

सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. सामंत यांनी लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर कोनशिलेचे अनावरण करुन आणि फित कापून पुस्तक दालनाचे उद्घाटन केले.

मराठी भाषा विभागातर्फे या दालनाला चरित्र, बालसाहित्य, ऐतिहासिक, माहितीपट, कविता संग्रह, लेख संग्रह अशी विविध १ हजाराहून अधिक पुस्तके वाचनाकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या वास्तूला भेट देणाऱ्या पर्यटकांना, विद्यार्थ्यांना पीएचडीचा अभ्यास करणाऱ्यांना, युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे साहित्य उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय या विद्यार्थ्यांसाठी येथे अभ्यासिका, पीएचडी, संशोधनात्मक अभ्यासक्रम आणि पत्रकारिता प्रशिक्षण सुरु करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी सांगितले,

तले.या प्रसंगी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर,नगरसेविका स्मिता पावसकर, वैभवी खेडेकर, प्रिती सुर्वे, पूजा पवार, भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, माजी जि. प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी, राजेंद्र महाडीक आदी उपस्थित होते.

 

000

संबंधित पोस्ट

तेलबिया व कडधान्य प्रक्रिया उद्योगांना चालना; गोदाम, ऑईल मिल आणि प्रक्रिया युनिटसाठी लाखोंचे अनुदान

स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाचमध्ये असावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खतविक्री आराखडा; खत खरेदीचे मोबाईल ॲपः पथदर्शी प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश

मराठी भाषा पंधरवडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ‘पुस्तक प्रदर्शन, ‘विक्री’ आणि ‘ग्रंथदान’ उपक्रम; ग्रंथदान करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मोताळा तालुक्यातील अवसायनातील 34 संस्थांची नोंदणी रद्द होणार;आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

एकल महिला धोरणासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन