vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण अंतिम, प्रारूप आरक्षणात कोणताही बदल नाही- उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे- विभागीय आयुक्त यांच्याकडून सर्व 73 आक्षेप नामंजूर 

निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण अंतिम, प्रारूप आरक्षणात कोणताही बदल नाही- उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे- विभागीय आयुक्त यांच्याकडून सर्व 73 आक्षेप नामंजूर

 सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील 61 निवडणूक विभाग करिता पुढील कालावधीसाठी अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीसंदर्भातील आक्षेप नामंजूर झाल्यामुळे प्रारूप निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षणामध्ये बदल झालेला नाही. निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम करण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मा. आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्याकडील दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशामधील तरतुदीनुसार सांगली जिल्ह्यातील 61 निवडणूक विभाग करिता पुढील कालावधीसाठी अनुसूचित जाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गसाठी राखून ठेवायची आरक्षण सोडत दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण करण्यात आली. तसेच जिल्ह्यात 10 तालुक्याच्या ठिकाणी एकूण 122 निर्वाचक गणाकरिता दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी निर्वाचक गणाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यावर दि. 14 ते 17 ऑक्टोबर 2025 अखेर हरकती व सूचना सादर करण्याच्या कालावधीत प्राप्त झालेले सर्व 73 आक्षेप विभागीय आयुक्त पुणे विभाग, पुणे यांनी नामंजूर केले. त्यामुळे प्रारूप निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षणामध्ये बदल झालेला नाही. निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नागपुरात दंगल करणाऱ्या दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

डीजे’मुक्त उत्सव व्हायला हवा; पण धर्म, संस्कृती, उत्सव यांवरील टीका खपवून घेणार नाही !पुरोगामी टोळ्यांनी केवळ गणेशोत्सवातच नव्हे, तर ध्वनिप्रदूषण करणाऱ्या भोंग्यांविरुद्धही आवाज उठवावा!*

vishwatmaklokswamivarta

सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी प्रमाणित बियाणे वाटपासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानांची दीक्षाभूमीला भेट

नगरपरिषदांच्या सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर…

vishwatmaklokswamivarta

२०१२ च्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घाला! – हिंदू संघटनांची शासनाकडे मागणी…