vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात 16 मेपासून घरयादी व घरगणना होणार- निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे- 14 जूनपर्यंत चालणार कार्यवाही – प्रगणकांना परिपूर्ण माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात 16 मेपासून घरयादी व घरगणना होणार- निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे- 14 जूनपर्यंत चालणार कार्यवाही – प्रगणकांना परिपूर्ण माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

 सांगली, प्रतिनिधी: जनगणना 2027 ही दोन टप्प्यांमध्ये शासनाकडून राबविली जाणार आहे. पहिला टप्पा हा घरयादी व घरगणनेचा असून, तो 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दरम्यान पार पडणार आहे. जनगणनेचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे 100 टक्के कुटुंबांची माहिती HLO ॲपमध्ये भरणे व कुटुंबांची गणना करणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरयादी व घरगणनेच्या कामकाजासाठी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक व परिपूर्ण माहिती देवून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

घरयादी व घरगणनेच्या कामकाजासाठी 21 चार्ज स्तरावर 4 हजार 421 प्रगणक व 791 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण हे दि. 23 एप्रिल 2026 ते दि.08 मे 2026 अखेर प्रत्येक चार्ज स्तरावर आयोजित केले होते. हे प्रशिक्षण जिल्हा स्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या 70 फील्ड ट्रेनर यांनी दिले आहे.

दिनांक 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या गावातील भागाला भेट देऊन प्रत्यक्ष घरगणना करणार आहेत. घरगणना करीत असताना ते शासनाने ठरवून दिलेले 34 प्रश्न घरातील प्रमुख अथवा उपस्थित व्यक्तीला विचारतील. ज्यामध्ये घराची स्थिती, कुटुंबांची माहिती, कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा तसेच कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता व इतर माहिती यांचा समावेश असेल. सदरची माहिती HLO ॲपद्वारे जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्णतः डिजिटल असून नागरिकांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

0000

संबंधित पोस्ट

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्येपायाभुत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

दिल्ली शंखनाद महोत्सवात ‘शौर्य’ व ‘श्रद्धा’ यांचा अद्भुत संगम!**मंगल पांडेंची बंदूक, पानीपत युद्धातील तोफ प्रथमच दिल्लीत…* **दुर्मिळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दिव्य अंश आणि रामसेतूची दिव्य रामशिळा यांचे दर्शन!*

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापना करून एक वर्ष झालं परंतु  उपायुक्त सहाय्यक आयुक्त एकूण 36 जागा भरल्या नाहीत ह्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावा अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी.

vishwatmaklokswamivarta