vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

२५ जुलै रोजी डोंबिवली मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शिबीरांचे आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 २५ जुलै रोजी डोंबिवली मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शिबीरांचे आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

ठाणे प्रतिनिधी- ठाणे जिल्ह्यात दि. २२ जुलै २०२६ ते ०२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना’च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने २५ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील 143-डोंबिवली विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष समाधान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांचे महसूल व प्रशासकीय प्रश्न एकाच छताखाली तात्काळ मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

 

या अभियानांतर्गत २५ जुलै २०२६ रोजी १४३-डोंबिवली विधानसभा मतदारसंघात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक आमदार श्री. रविंद्र दत्तात्रय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबीर डोंबिवली (पश्चिम) येथील देवीचापाडा, रेतीबंदर क्रॉस रोडवरील गावदेवी मंदिर हॉलच्या तळमजल्यावर पार पडणार आहे. या परिसरातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले, नोंदी व शासकीय योजनांचा लाभ सहजरीत्या मिळावा यासाठी हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन व समन्वयाची जबाबदारी कल्याणचे प्रभारी उपविभागीय अधिकारी श्री. सर्जेराव मस्के पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असून नागरिकांच्या सोयीसाठी त्यांचा संपर्क क्रमांक ९४०५३५७४५७ असा जारी करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या या अभियानाद्वारे सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता व गतिमानता आणावी यावर भर दिला जात आहे. डोंबिवली व बेलापूर मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी २५ जुलै रोजी आयोजित केलेल्या या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले

 

 

 

 

संबंधित पोस्ट

लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत रास्तभाव धान्य दुकानातुन धान्य उचल करावी

vishwatmaklokswamivarta

तमाशा कलावंतांसमोरील आव्हानांच्या अभ्यासासाठी समिती – मंत्री ॲड. आशिष शेलार

अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई आईस्क्रीम व खाद्यतेलाचा २ लाख ८४ हजार किंमतीचा साठा जप्त

अमली पदार्थ विरोधी प्रबोधनासाठी स्पर्धेत सहभागासाठी 8 मार्च मुदत

ऐरोली परिसरात मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भातअभ्यास अहवाल तयार करावा- वनमंत्री गणेश नाईक

अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पदोन्नत अधिकाऱ्यांचा पद अलंकरण सोहळा