vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन आणि विद्यार्थ्यांचा आवाज अभियानाला शहर काँग्रेसची धार महाराष्ट्र राज्य सहप्रभारी रेहाना रियाज चिश्ती यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; युवक-विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन आणि
विद्यार्थ्यांचा आवाज अभियानाला शहर काँग्रेसची धार महाराष्ट्र राज्य सहप्रभारी रेहाना रियाज चिश्ती यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; युवक-विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा

जालना (प्रतिनिधी) : शहर काँग्रेसच्या वतीने विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन आणि विद्यार्थ्यांचा आवाज या अभियानांच्या अनुषंगाने आढावा बैठक उत्साहात पार पडली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र राज्य सहप्रभारी रेहाना रियाज चिश्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अभियानाची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांशी संवाद, संघटनात्मक बांधणी तसेच आगामी कार्यक्रमांच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेचा आढावा घेण्यात आला. मतदार नोंदणी प्रक्रियेत नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियपणे काम करावे, तसेच युवक व विद्यार्थ्यांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शन करताना रेहाना रियाज चिश्ती यांनी युवक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम कटिबद्ध असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्यासाठी संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, रोजगार, स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी विविध सूचना मांडल्या. तळागाळातील नागरिकांशी थेट संपर्क वाढवून मतदार जनजागृती आणि युवक सहभाग वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बैठकी च्या अध्यक्ष स्थानी जालना शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे हे होते. या वेळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष कल्याण दळे, मा.आ.राजेश राठोड,राजेंद्र राख,राजाभाऊ देशमूख डाॅ. अस्मिता शहापूरकर एडवोकेट सय्यद अक्रम राजेश मुंडे ,बदर चाऊस,संजय ईंगळे,करीम बिल्डर, उबाळे पाटील, कृष्णा पडूळ, राजाभाऊ कुलकर्णी, चंद्रकांत रत्नपारखे, आदित्य चंदनकर, सागर चौधरी, शेख जमीर सर, प्रमोद अलाड, शेख शमशुद्दीन, रघुवीर गुडे, दायमाजी, ॲड. गव्हाणे, शेख वसीम, मोईज अन्सारी, ज्ञानेश्वर डुकरे, आरिफ खान, कलीम खान, सुरज यलगंटवार, शेख जमीर, देवराज डोंगरे, वसीम खान, दिनेश सूराना, जावेद कुरेशी, वैभव निर्मल, सलमान खान, नूर मोहम्मद, जफर मिर्झा, सय्यद रज्जाक, इमरान खान, राम भवर, भरत लोडा, दिग्विजय, अंकुश शिंदे, जावेद खान, सै. फैजान, शेख शब्बीर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत दोन्ही अभियाने अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी संघटन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

One attachment
• Scanned by Gmail

संबंधित पोस्ट

दिव्यांग बांधवानी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या-मतदार जनजागृती उपक्रमांची राज्य निवडणुक आयुक्तांकडून वाखाणणी

vishwatmaklokswamivarta

कुटुंब नियोजन क्षेत्रात उकृष्ट कार्य करणारे ६५ कर्मचारी सन्मानीत

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी* *राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी*

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवाआता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस