vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

केंद्राच्या चार श्रम संहितांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध; हरकती व सूचना नोंदवण्याचे कामगार उपआयुक्त कार्यालयाचे आवाहन

केंद्राच्या चार श्रम संहितांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध; हरकती व सूचना नोंदवण्याचे कामगार उपआयुक्त कार्यालयाचे आवाहन

 

ठाणे, प्रतिनिधी- केंद्र शासनाने देशातील कामगार कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत ‘वेतन संहिता, 2019’, ‘औद्योगिक संबंध संहिता, 2020’, ‘व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता, 2020’ तसेच ‘सामाजिक सुरक्षा संहिता, 2020’ या चार श्रम संहिता 21 नोव्हेंबर 2025 रोजी देशभरात लागू केल्या आहेत. या केंद्रीय संहितांच्या राज्य स्तरावरील प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने स्वतःची नियमावली तयार करून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

राज्यातील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांचे हित, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षण अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या कामगार विभागाने, विधी व न्याय विभागाच्या सहकार्याने ही नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचा मसुदा दि.28 एप्रिल 2026 ते दि. 5 मे 2026 या कालावधीत अधिसूचनेद्वारे जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. या मसुदा नियमांची प्रत कामगार विभागाच्या www.mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

ही नियमावली अंतिम करण्यापूर्वी या क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. त्याकरिता राज्यातील सर्व औद्योगिक आस्थापना, बांधकाम व्यावसायिक, विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या कंपन्या (ॲग्रिगेटर्स), सर्व कामगार संघटना, असंघटित कामगार आणि वैयक्तिक स्तरावरील सुजाण नागरिक यांनी या मसुदा नियमांचा सखोल विचारविनिमय करून आपल्या हरकती व सूचना नोंदवाव्यात, जेणेकरून सर्वांच्या सहभागातून एक सर्वसमावेशक व न्याय्य नियमावली तयार करणे शक्य होईल.

 

प्रस्तावित नियमावलीवर राज्यातील सर्व संबंधित घटकांनी आपल्या हरकती आणि सूचना, हा मसुदा नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात नोंदवाव्यात, असे आवाहन कामगार उपआयुक्त कार्यालय, ठाणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.0000

संबंधित पोस्ट

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारे प्रकल्प गतीने पूर्ण करा -मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

गोविंदनगर येथील वै. ह.भ.प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांचा 6 वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पडला पार… 🎊🙇🏻‍♂️

मुंबईतील सर्वात मोठी दुर्दैवी घटना -विरार येथील बावीस वर्षे तरुणाचा लोकल रेल्वे चा फर्स्ट क्लास डब्यामध्ये हत्या आरोपी फरार पोलीस आरोपीचा शोध घेत आहे

आजपासून (दि.९) तीन दिवस दुर्मिळ वाद्यमहोत्सव

vishwatmaklokswamivarta