vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*

*पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*

 

मुंबई, प्रतिनिधी : परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतींचा आदर राखत पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांचे मुंबईतील अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सहकुटुंब पारंपरिक पद्धतीने बाप्पाची पूजा-अर्चा करून आरती केली.

श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील तसेच देशभरातील गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनात आनंद आणून सर्व विघ्ने दूर करावीत. देश, राज्य, नागरिक आणि बळीराजासमोरील अडचणी दूर होऊन सर्वांना नवचैतन्य, सामर्थ्य आणि समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. गणेशोत्सव हा श्रद्धा, आनंद आणि परंपरेचा उत्सव आहे. सर्व गणेशभक्तांनी हा उत्सव आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करावा. मात्र, गणेशोत्सवाच्या उत्साहाबरोबरच पर्यावरणाचे भान राखण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून तो समाजाला एकत्र आणणारा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करणारा उत्सव असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले. परंपरेचे जतन, पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधत सर्वांनी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित पोस्ट

अमरावतीतील ड्रग्सविरोधी कारवायांवर शासनाचे बारकाईने लक्ष- गृहराज्यमंत्री योगेश कदम

करवीर हायकर्स’ च्या सातजणांची तिरंगा फडकवून,संविधान उद्देशिका प्रदर्शनाने एवरेस्ट बेस कँप’ यशस्वी… 

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हाभर व्यापक उपक्रम….

vishwatmaklokswamivarta

जालन्यातील जनहिताच्या प्रमुख प्रकल्पांना निधी उपलब्ध करा – खा. डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. घाणेवाडी तलाव दुरुस्ती, आयसीटी कॉलेज, पाणी पुरवठा, प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनेसाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घाला, पोलीस ठाण्यांची संख्या वाढविण्याची केली मागणी…

बम बम भोलेनाथ बाबा अमरनाथ यात्रेची नोंदणी येत्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

झिरो ब्युरोक्रसी’कडे शासनाची वाटचाल; प्रशासनाने ‘स्टार्टअप’सारखे काम करावे— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नागरी सेवा दिन आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

vishwatmaklokswamivarta