vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

 

जालना (प्रतिनिधी) :

जालना शहरात रविवार दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी बुद्धिबळ प्रेमींसाठी मोठा सोहळा रंगणार आहे. जालना गणेश फेस्टिव्हलच्या वतीने कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल, जुना जालना येथे खुली गट तसेच 15 वर्षाखालील व 10 वर्षाखालील गटांत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना आकर्षक रोख पारितोषिके व ट्रॉफी देण्यात येणार असून, सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.

स्पर्धेतील पारितोषिके खुला गट : प्रथम – ₹2101, द्वितीय – ₹1501, तृतीय – ₹1001, 15 वर्षाखालील गट : प्रथम – ₹1501, द्वितीय – ₹1001, तृतीय – ₹701, 10 वर्षाखालील गट : प्रथम – ₹1001, द्वितीय – ₹701, तृतीय – ₹501

स्पर्धेसाठी आवश्यक अटी : स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी स्वतःचा बुद्धिबळपट सोबत आणणे बंधनकारक आहे. तसेच 15 व 10 वर्षाखालील गटातील खेळाडूंनी आपला नगर परिषदेचा जन्म दाखला सोबत ठेवणे आवश्यक आहे.

* संयोजन समितीचे आवाहन *

या बुद्धिबळ महोत्सवात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जालना गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, अध्यक्ष अशोकराव आगलावे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब घुगे तसेच मुख्य पंच श्री. सतीश ठाकूर व पंच श्री. कृष्णा ठाकूर यांनी केले आहे.

नावनोंदणीसाठी सतीश ठाकूर 9960640602 / 7620857664 या नंबर वर संपर्क करून नोंदणी करावी. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील लहानग्या खेळाडूंना आपले बुद्धिबळ कौशल्य सादर करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

संबंधित पोस्ट

परिवर्तनवादी गीते, प्रबोधनात्मक व्याख्यान.. यंदाची भीमजयंती ठरणार विचारांचा महोत्सव! सार्वजनिक जयंती उत्सव समितीची जय्यत तयारी; अध्यक्ष निलेश राऊत यांची माहिती …

जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा  – पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय  कार्यालयात आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधीतून कल्याण तालुक्यातील काही शाळा व शासकीय रुग्णालयांना संगणक, प्रिंटर्स व टॅब्सचे वाटप

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणी दिनांकात बदल21 डिसेंबरला होणार मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर, सांगली, सातारा येथे ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर’ स्थापन करण्यात येणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta