vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

नेव्हिगेशन स्क्रिनमुळे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात हव्या असलेल्या विभागात जाणे झाले सोपे

नेव्हिगेशन स्क्रिनमुळे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात हव्या असलेल्या विभागात जाणे झाले सोपे

 

नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीस अनेक नागरिक विविध कामांसाठी भेटी देत असतात, त्याचप्रमाणे ही इमारत आयकॉनिक रचनेची असल्याने विविध मान्यवर तसेच पर्यटकही मुख्यालय वास्तू बघण्यासाठी येत असतात. ही इमारत भव्यतम व वैशिष्ट्यपूर्ण अशी गोलाकार रचनेची असल्याने नागरिकांना कोणता विभाग कितव्या मजल्यावर व कोणत्या दिशेला आहे हे समजण्यासाठी येथे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच डिजीटल स्क्रिनवरही त्याबाबतची माहिती प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

 यामध्ये अधिक अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने किऑक्स स्वरुपातील ‘दिशादर्शक अथात नेव्हीगेशन स्क्रिन’ लावण्यात आली असून त्यामुळे नागरिकांना अत्यंत सुलभ रितीने आपल्याला हवा असलेला विभाग व अधिका-यांचे दालन शोधणे सोपे झाले आहे.

 ही नेव्हिगेशन स्क्रिन टचस्क्रिन स्वरुपाची असून या नेव्हिगेशन स्क्रिनवर मुख्यालयाच्या प्रत्येक मजल्याचे रेखाचित्र दिसते. त्यामधून नागरिकांनी आपले काम असलेल्या संबंधित विभागावर अथवा अधिकारी यांच्या पदनामावर नेव्हिगेशन स्क्रिनवर टच केल्यास लिफ्टमधून उतरल्यानंतर कोणत्या दिशेला जायचे याचा मार्ग दाखविला जातो. त्याचप्रमाणे तो मार्गक्रम लिखीत स्वरुपातही दर्शविला जातो. नागरिकांच्या सोयीसाठी मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये नेव्हीगेशन स्क्रिनवर मजकूर प्रदर्शित करण्यात आला असून ज्या विभागांना जास्तीत जास्त नागरिक भेट देतात ते विभाग प्राधान्यक्रमाने दिसण्याचीही सुविधा करण्यात आलेली आहे.

 सद्यस्थितीत तळमजल्यावरील मध्यवर्ती लिफ्टच्या बाजूला ही नेव्हीगेशन स्क्रिन स्टँडवर बसविण्यात आलेली असून दुसरा, तिसरा व चौथा अशा एकूण चार मजल्यांवर अशा प्रकारच्या नेव्हीगेशन स्क्रिन लावण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांचे ज्या विभागात अथवा ज्या अधिका-याकडे काम आहे त्याची प्रत्यक्ष माहिती मिळणार असल्याने तेथे थेट जाणे सोयीचे होणार आहे.

 महानगरपालिका मुख्यालयात असलेल्या विविध विभागांकडे जाण्याचे मार्गक्रम दर्शविणारे फलक ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. यामध्ये अधिक भर घालत नेव्हिगेशन स्क्रिनमुळे सर्वसामान्य नागरिकांना फारशी शोधाशोध करावी न लागता ज्या विभागात काम आहे त्या विभागामध्ये विनासायास पोहचणे सुलभ होणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांची महानगरपालिकेशी संबधित सर्व कामे सहजपणे व्हावीत यावर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा भर असून त्यादृष्टीने महानगरपालिकेशी संबधित सर्व लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याच धर्तीवर आधुनिक तंत्रशीलतेवर भर देत नेव्हिगेशन स्क्रिनचा प्रभावी वापर करुन महापालिका मुख्यालयात नागरिकांना विभाग अथवा अधिका-यांचे दालन शोधण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे.

संबंधित पोस्ट

फलटण येथे पालखी सोहळ्यात “चरण सेवा” उपक्रम; हजारो वारकऱ्यांना दिलासा-मुख्यमंत्री सहायता योजना व आरोग्य विभागाचा पुढाकार – फार्मसी विद्यार्थ्यांची सेवाभावाने सहभाग

महाराष्ट्र सिनेमा ॲक्टमध्ये ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’या धर्तीवर सुधारणा करणार- सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 2928 प्रकरणे निकाली*

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या कायापालटासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार : आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची ग्वाही

गणेशोत्सवास प्रारंभ होत असून आरती संग्रहातून नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता व पर्यावरणशीलतेचा संदेश…

संरक्षित शेतीसाठीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार