vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे ६० जप्त वाहनांचा २७ मे रोजी ई-लिलाव* *इच्छुकांनी २१ मे पूर्वी नोंदणी करावी

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे ६० जप्त वाहनांचा २७ मे रोजी ई-लिलाव* *इच्छुकांनी २१ मे पूर्वी नोंदणी करावी

 

रायगड प्रतिनिधी: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्या वतीने मोटार वाहन कायदा १९८८ व मुंबई मोटार वाहन कर नियम १९५८ अन्वये जप्त करण्यात आलेल्या ६० वाहनांचा ई-लिलाव दि. २७ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा लिलाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये कराधान प्राधिकाऱ्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून घेण्यात येत आहे.

ई-लिलावात भाग घेणाऱ्या इच्छुकांनी ३४ हजार नोंदणी शुल्क (ना परतावा) आणि रु. ४ लाख ९४ हजार ठेव रक्कम (परतावा) DD द्वारा “Dy RTO PEN” या नावाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे भरावयाची आहे. लिलावाची सविस्तर माहिती व अटी http://www.eauction.gov.in या संकेतस्थळावर दि. १६ मे २०२५ पासून उपलब्ध आहे.

ई-लिलावाचे वेळापत्रक

नोंदणी सुरूवात: २० मे २०२५ सकाळी १० वाजता

नोंदणी समाप्ती: २१ मे २०२५ दुपारी ५ वाजता.

कागदपत्र पडताळणी व मंजुरी: २२ मे २०२५ सकाळी ११ वाजता

वाहने पाहणीची वेळ:

सुरुवात: १७ मे २०२५ सकाळी १० वाजता

शेवट: २५ मे २०२५ सायंकाळी ६ वाजता

ई-लिलाव दिनांक: २७ मे २०२५

वेळ: दुपारी १२ ते २ वाजता

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पेण यांनी कोणतेही कारण न देता लिलाव रद्द अथवा तहकूब करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत. इच्छुकांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून आणि अटी-शर्तींची पूर्तता करून लिलावात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

जिल्ह्यात पुरेसा जलसाठा उपलब्ध; पाटबंधारे विभागाची माहितीअफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

केटरिंग व्यावसायिकांमध्ये जनजागृती;अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन 

मराठवाडा विभागस्तरीय ७० व्या कामगार नाट्य स्पर्धा-प्राथमिक फेरीचे पारितोषिक वितरण उद्या(दि.१५)

vishwatmaklokswamivarta