vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी-जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी

रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी-जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी

रायगड प्रतिनिधी:भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर, संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीने दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात १७ मे २०२५ ते ३ जून २०२५ या कालावधीत ड्रोन व तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या परिसरात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणास सक्त मनाई करण्यात आली आहे.

हा आदेश पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या शिफारशीनुसार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कोणतीही शंका असल्यास संबंधित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकस्थळी वैचारिक अभिवादन,5 डिसेंबरला डॉ.अजित रानडे यांचे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर व्याख्यान

vishwatmaklokswamivarta

अग्रवाल युवा मंचची नुतन कार्यकारिणी जाहीर…

vishwatmaklokswamivarta

देशाच्या विकासासाठी आणि धोरणनिर्मितीसाठी ‘एनएसओ’तर्फे 2026-27 मध्ये विविध सर्वेक्षणांद्वारे महत्वपूर्ण माहितीचे संकलन रोजगार, महागाई, उद्योग आणि कौटुंबिक उत्पन्नाचा घेणार वेध; ‘संख्या मित्रां’ मार्फत होणार माहिती संकलन

महत्त्वाचा संदेश.- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल…

vishwatmaklokswamivarta

गोवा बनावटीची अवैध दारु जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

vishwatmaklokswamivarta

प्रशासन हे सुशासन करण्यात ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta