vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन

नांदेड प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या विशेष मोहिम शिबीर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त अर्जदार-पालकांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष, उपायुक्त तथा सदस्य, व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांच्या निर्देशानुसार राज्यात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम येत्या 8 ते 14 एप्रिल या कालावधीत साजरा करण्याचा शासन निर्णय 30 मार्च 2026 रोजी घेतला आहे. या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या कार्यालयांना या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत या कालावधीत समिती कार्यालयात पुढीलप्रमाणे विशेष मोहिम शिबिर राबविण्यात येत आहे.

विशेष मोहीम कार्यक्रम-बुधवार 8 एप्रिल 2026 रोजी शैक्षणिक, सेवा व निवडणूक विषयक ज्या जाती दावा प्रकरणामध्ये कागदपत्रे पुरावे अभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेत, अशा अर्जदार यांना त्रुटी पूर्ततेबाबत समितीने यापूर्वी एसएमएस व ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे. अशा अर्जदार अथवा पालकांनी सदर दिवशी उपस्थित राहुन त्रुटीची पुर्तता केल्यास अशा प्रकरणात प्राधान्याने समितीमार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. ​

गुरूवार 9 व शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी समिती स्तरावर विशेष सुनावणी आयोजित करुन जाती दावा प्रकरणे प्राधान्याने व निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच विशेष सुनावणी दरम्यान उपस्थित अर्जदार-पालक यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी व जातवैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडी-अडचणीबाबत समक्ष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सोमवार 13 एप्रिल 2026 रोजी समितीने वैध केलेल्या प्रकरणात अर्जदार यांना ऑनलाईन वैधता Validity प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुंबईतील लालबागचा मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती येथून थेट गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या आपल्या वेबसाईट पोर्टलला आपल्या सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळासाठीउद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविणार – कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शोध व बचाव पथकांचे काटेपूर्णा प्रकल्प येथे प्रशिक्षण राज्य पथकाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन..

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या – पालकमंत्री नितेश राणे जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक संपन्न

मुंबईसह अनेक भागांत जोरदार मुसळधार पावसाचा इशारा