vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- गेल्या दोन महिन्यात महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱ्या 2055 वाहनधारकांना ई चालान जारी

बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- गेल्या दोन महिन्यात महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱ्या 2055 वाहनधारकांना ई चालान जारी

सांगली, प्रतिनिधी: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रडार इंटरसेप्टर वाहन हे रस्त्यांवरील बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी सज्ज झाले आहे. परिवहन विभागाने या अत्याधुनिक इंटरसेप्टर रडार वाहनांमध्ये लेझर गन आणि अत्याधुनिक कॅमेरे बसविले आहेत. नियम मोडणाऱ्या वाहनचालकाला आता आरटीओ अधिकारी थांबविण्याची आवश्यकता नाही. वाहनातील कॅमेरे आपोआप नियम उल्लंघन करणाऱ्याचा फोटो काढतात आणि थेट मोबाइलवर ई-चलन पाठवले जाते. माहे फेब्रुवारी २०२६ आणि माहे मार्च २०२६ या दोन महिन्यामध्ये महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱ्या 2 हजार 55 वाहनधारकांना ई चालान जारी करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील सहा महामार्ग सांगली – पेठ महामार्ग, सांगली – मिरज महामार्ग, सांगली – अंकली महामार्ग, अंकली – नागज महामार्ग, आष्टा – पेठ वडगाव मार्ग, आष्टा – भिलवडी मार्ग या मार्गावरती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित आहे. रडार- इंटरसेप्टर वाहन हे तासाला 800 वाहनांवर लक्ष ठेवून ई-चलान जारी करू शकतात. ही सिस्टीम अतीवेगासह लेन कटिंग, सीटबेल्ट, हेल्मेट नसणे अशा गुन्ह्यांचा पुरावा कॅप्चर करून संबंधित वाहन चालकाच्या व वाहनांवर चलान जारी करते.

 वाहनधारकांनी वाहन चालवताना दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि कार चालकांनी सीटबेल्टचा वापर करावा. वाहन चालवताना फोनवर बोलणे किंवा मेसेज करणे टाळावे. वाहनाचा वेग मर्यादेत ठेवावा. समोरील वाहनापासून पुरेसे सुरक्षित अंतर राखावे. चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करू नये. मद्यपान करून किंवा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये. वाहनाचे ब्रेक, टायर्स आणि लाईट्स नियमित तपासावे. लायसन्स आणि गाडीची कागदपत्रे सोबत ठेवावी. परिवहन विभागाने सज्ज केलेल्या अत्याधुनिक रडार इंटरसेप्टरची नजर वाहनचालकांवर असून वाहनधारकांनी वाहन चालवतांना नियम तोडू नये, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा-अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई कर     – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

पहलगाम दहशतवादी हल्ला-राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत वितरीत..

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- खा. श्रीरंग बारणे दिशा’ समितीची बैठक संपन्न

साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषिमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

vishwatmaklokswamivarta