vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

      सांगली, प्रतिनिधी : पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे याचा ग्राहकांना सुरळीत पुरवठा सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

 सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा पेट्रोल 520 किलो लिटर व डिझेल 640 किलो लिटर, बीपीसीएल कंपनीचा पेट्रोल 690 किलो लिटर व डिझेल 840 किलो लिटर आणि आयओसीएल कंपनीचा पेट्रोल 1510 किलो लिटर व डिझेल 1540 किलो लिटर इतका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी पेट्रोल व डिझेल पंपावर अनावश्यक गर्दी करणे टाळावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

 तसेच जिल्ह्यात एलपीजीचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा 3453 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 93.6 मेट्रिक टन आणि आयओसीएल कंपनीचा 43 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून आणखी 82.6 मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येण्यास मार्गस्थ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडर वितरीत करण्यात येणार असल्याचेही प्रसिध्दीपत्रकाव्दारे स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्ह्याला 82 लक्ष रू. चे उद्दिष्ट प्रत्येकाने योगदान देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय-विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

vishwatmaklokswamivarta

17वा रोजगार मेळावा: महाराष्ट्रातील 296 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण भारतीय टपाल विभागाकडून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेळाव्याचे यशस्वी आयोजन

vishwatmaklokswamivarta

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

गणेशपूर होणार ‘कवितेचे गाव’; लाखनी ‘पुस्तकांचे गाव’ जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषेसाठी स्वतंत्र कक्ष; मान्यवर साहित्यिकांशी मंत्री डॉ. उदय सामंत यांचा संवाद

आंतरराष्ट्रीय योग दिन; ‘माय भारत’ व ‘योगसंगम’ पोर्टलवर नोंदणी करा –जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन