vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

 

राज्य प्रतिनिधी-

शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान/ भरडधान्य खरेदी केले जाते. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.

खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये शेतकरी नोंदणीकरिता 31 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत होती. मात्र अनेक भागातील शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने शासनाने नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अर्थ व नियोजन विभागाचे राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार राजू कारेमोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीस अनुसरून शेतकरी नोंदणीची मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या उपसचिव राजश्री सारंग यांनी महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळासह संबंधित एजन्सी यांना याबाबत कळवले आहे.

 

ही मुदतवाढ अंतिम असून विहित मुदतीत शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय वास्तूस आकर्षक रोषणाईव्दारे तिरंगी झळाळी 

vishwatmaklokswamivarta

राज्यातील काही जिल्हयांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्याच्या महत्वाच्या ठिकाणी एनडीआरएफच्या सतरा आणि एसडीआरएफच्या सहा पथकं सज्ज..

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी* 

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन..

जय शिवाजी, जय भवानी”च्या जयघोषाने दुमदुमले गडचिरोली!*जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न”शिवरायांचे विचार अंगीकारून व्यक्तिमत्त्व घडवा” – जिल्हाधिकारी एकता पार्क चे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

सागरीमार्ग केवळ श्रीमंतांपुरता नको, सर्वसामान्यांसाठी ‘प्रवासी जलवाहतूक’सुरू करा! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे शासनाला आवाहन