vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बाल शक्ती पुरस्कार; ऑनलाईन अर्ज आमंत्रित

बाल शक्ती पुरस्कार; ऑनलाईन अर्ज आमंत्रित

राज्य प्रतिनिधी बुलडाणा,( : केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी पात्र मुलांचे अर्ज ऑनलाईन 31 जुलै 2025 पर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 5 वर्षे पेक्षा अधिक आणि 18 वर्षापर्यंतच्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य आणि शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहे. सदरचे अर्ज www.awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहे. मुलांचे वय 5पेक्षा अधिक व 31 जुलै 2015 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपुर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे प्रस्ताव ऑनलाईन स्वतः मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात. जिल्ह्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अतिवृष्टी नुकसानीची पाहणी; आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे

विधानपरिषद निवडणुकीला राज्यात सुरुवात 🗳️🇮🇳महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी सुरू झाली. 

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते २९ जून रोजी ‘आरोग्य सेतू २.०’ चा होणार शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाचा उपक्रम;-प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन

पुढील आठवड्यात महाकर्जमुक्ती लाभ वाटपाला होणार प्रारंभ,५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा..