vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी गावासाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी गावासाठी टँकर मंजूर

        बुलडाणा प्रतिनिधी: पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता सिंदखेडराजा तालुक्यातील नागझरी गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

नागझरी येथे 1 हजार 18 लोकसंख्येसाठी एक टॅंकरद्वारे 16 हजार 360 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

📢 महत्वाची सूचना – किल्ले रायगडावर पायरी मार्ग बंद!

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 3 ठिकाणी धाड, 9 सिलेंडर जप्त- पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार फिरत्या पथकाची कारवाई

नव वर्षानिमित्त प्रत्येक कार्यालयाने संकल्प करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली शेगाव येथील तयारीची पाहणी.

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर…