vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकठळक बातम्या

मिफ्फ-2026 निमित्त फिल्मसिटीकडून मराठी लघुपट व माहितीपटांचे आयोजन

 

मिफ्फ-2026 निमित्त फिल्मसिटीकडून मराठी लघुपट व माहितीपटांचे आयोजन

मुंबई, प्रतिनिधी : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) 2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, 16 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात होणार आहे.

हा महोत्सव 16 ते 20 जून 2026 या कालावधीत दररोज सायंकाळी 6.30 वाजता रंगणार असून, 19 जून रोजी मात्र सायंकाळी 4 ते 6 या वेळेत चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित आणि प्रस्थापित दिग्दर्शकांच्या कलाकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मंगळवार, 16 जून 2026 रोजी ‘मायबाचे आशीर्वाद’, ‘मेतकूट’ व ‘नेहमीच’ हे लघुपट तर फड हा माहितीपट दाखविण्यात येणार आहे. बुधवार, 17 जून रोजी ‘वेणी’, ‘जास्वंद’, ‘पॅम्पलेट’, ‘अर्जुन’ हे लघुपट; तर ‘महाल्ले’ हा माहितीपट दाखविण्यात येईल. गुरुवार, 18 जून रोजी ‘ब्रह्मकमळ’, ‘गढूळ’, ‘डीयर 202’, ‘17 वे वर्ष’ हे लघुपट; तर ‘फड’ हा माहितीपट दाखविण्यात येईल. शुक्रवार, 19 जून रोजी ‘पाणखोल’, ‘अर्जुन’, ‘डोंगर पाणी’, ‘दारवठा’ हे लघुपट दाखविण्यात येईल. शनिवार, 20 जून 2026 रोजी ‘वाघ’, ‘सापशिडी’, ‘मुक्ता’, ‘दारवठा’ हे लघुपट दाखविण्यात येणार आहेत

या चित्रपटांमधून ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव, मानवी नातेसंबंध, सांस्कृतिक परंपरा आणि समकालीन प्रश्नांचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडले जाणार आहेत.

000

संबंधित पोस्ट

अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील -जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक संपन्न 

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

आगामी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी-प्रतिबंधात्मक आदेश जारी

दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन