vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

केस व नख गळतीच्या आजारावर नियंत्रणासाठी केंद्रीय पथकाला निर्देश-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

   ★केस व नख गळती आजाराच्या संशोधनासाठी केंद्रीय पथक दाखल    ★केंद्रीय पथकाला सहकार्य करा

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील काही गावांमध्ये केस गळतीचे आणि त्यानंतर नख गळतीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केंद्र सरकारच्या पथकाला या आजाराच्या मुळाशी जाऊन कार्य करण्याचे निर्देश दिले.

केस व नख गळतीच्या पश्वभूमीवर मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयसीएमआर, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्लीचे डरमेटोलॉजी तज्ज्ञ, FSSAI, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा, प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, रुग्णांना पुन्हा त्रास होऊ नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच या आजाराचे मूळ कारण शोधून त्यावर प्रभावी उपाययोजना करा. यासाठी रुग्णांचे रक्ताचे नमुने तसेच बाधित गावातील पाणी, माती, धान्य आदींचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे सुचना दिल्या.

केंद्रीय पथक दोन दिवस बांधीत गावाला भेटी देणार असून रुग्णांशी भेटी घेऊन आजाराचे मूळ कारण शोधणार आहे. त्यामुळे नागरिकांनी केंद्रीय पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन ना. प्रताप जाधव यांनी यावेळी केले.

बुलडाणा जिल्ह्यातील पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगाव, बोंडगाव, शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. या प्रकरणाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या नऊ विभागांचे तज्ज्ञ आज जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तज्ज्ञांकडून आता गावागावात जाऊन रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत प्रत्यक्ष माहिती संकलन केले जाईल. यावरूनच या आजाराचा खरा स्रोत आणि त्यावरील उपाय निश्चित केले जातील.

 

००००००

संबंधित पोस्ट

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी-सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन

मुक्तिसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा’; बार्टीतर्फे आज कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

ग्रोयान्स बंधारा, जेट्टी बांधणे व नौकानयन मार्गातील गाळ काढणे हा महत्वाकांक्षी प्रकल्प -मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री-नितेश राणे

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत ठाणे शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर दैनंदिन 10 टक्के कपात…

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध – अग्रिम निधी वितरित

vishwatmaklokswamivarta