vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी आज सुट्टी   

नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी आज सुट्टी

नांदेड प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, मुखेड, कुंडलवाडी, भोकर व लोहा नगरपरिषदेच्या मतदार संघात सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने धर्माबाद, मुखेड, कुंडलवाडी, भोकर व लोहा नगरपरिषदेच्या मतदार संघात शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

ही सार्वजनिक सुट्टी धर्माबाद, मुखेड, कुंडलवाडी, भोकर व लोहा या मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच या मतदान असलेल्या क्षेत्रातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इ. ना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहिल असे नमूद केले आहे, अशी माहिती जिल्हा सह आयुक्त गंगाधर इरलोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

0000

संबंधित पोस्ट

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला ‘झिरोधा’चा प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 30.04 टी.एम.सी. पाणीसाठा

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अपघाताची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी- उपमुख्यमंत्री अजित पवारअपघातातील जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत, उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

भारतीय सैन्याने दाखविलेल्या पराक्रमाला  क्रांतीचौकात देशभक्तिपर गीतांच्या माध्यमातून भारतमातेचा जयघोष करीत सलाम करण्यात आला. देशसेवा करताना वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली