vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अपघाताची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी- उपमुख्यमंत्री अजित पवारअपघातातील जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत, उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश..

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अपघाताची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी- उपमुख्यमंत्री अजित पवारअपघातातील जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत, उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश..

मुंबई प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात पिकअप गाडी पलटी होऊन झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगात शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

      आपल्या संदेशात अजित पवार म्हणाले की, या अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. पोलिसांनी जखमींना पिकअप व्हॅनमधून बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले.जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींना आवश्यक सर्व वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्य शासन या कठीण काळात अपघातग्रस्त नागरिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे असल्याचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

000000

संबंधित पोस्ट

राज्यातील आयकॉनिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यावरती पर्यटन विभागाने भर द्यावा,पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंतीदिनानिमित्त नमुंमपा मुख्यालयात अभिवादन.

vishwatmaklokswamivarta

सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) आझाद मैदानावर धडक मोर्चा 

स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागाचा विकास होणार*  – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले*

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामधल्या २० जणांवर ८१ लाख रुपयांचं इनाम जाहीर होतं. 

महापारेषणला पॉवर ट्रान्समिशन पुरस्कार प्रदान अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्याकडून अभिनंदन

vishwatmaklokswamivarta