vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती…’जिल्हाधिकारी स्वामी यांचे महिला सक्षमीकरण कार्यशाळेत आवाहन

‘दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती…’जिल्हाधिकारी स्वामी यांचे महिला सक्षमीकरण कार्यशाळेत आवाहन

   छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- शिक्षकांनो जिल्ह्यातील दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती आहे. त्यांना जगायचे कसे, संकटांना सामोरे कसे जायचे हे शिकवा. संस्कारक्षम विद्यार्थी घडवा. असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळेत केले.

   कन्नड येथे आज महिला सक्षमीकरण व संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, शिक्षणाधिकारी आश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती चव्हाण, विस्तार अधिकारी जे व्ही चौरे, गटशिक्षण अधिकारी मनीष दिवेकर यावेळी उपस्थित होते.नाचनवेल केंद्रातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी स्वामी यांचे औक्षण करून स्वागत केले. दीपप्रज्वलनानंतर शिवराय केंद्र हतनूर येथील विद्यार्थ्यांनी दशसूत्री पथनाट्य सादर केले.

प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी केले. तर गटशिक्षण अधिकारी मनीष दिवेकर, विस्तार अधिकारी लईक सोफी यांनीही यावेळी उपस्थित शिक्षिकांशी संवाद साधला. कार्यक्रमास तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील महिला शिक्षक, शाळाप्रमुख, मुख्याध्यापक, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.

०००००

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातअनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेसर्वेक्षण पथकास सहकार्य करण्याबाबत महानगर आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना…

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणीय उल्लंघन प्रकरणी पडताळणीनंतरजेएसडब्ल्यू कंपनीवर नियमानुसार कारवाई करणार- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ मार्च रोजी वितरण

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ संपन्न

पालकांनी अधिकृत मान्यताप्राप्त शाळेतच-आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्याचे आवाहन