vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करा – व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करा – व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

मुंबई, प्रतिनिधी : अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई मार्फत अनुसूचित जातीतील मातंग व त्यातील तत्सम जातीच्या पात्र विद्यार्थ्यांनी 2023, 2024 व 2025 या कालावधीत पीएच.डी करीता अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

आर्टी मार्फत अनुसूचित जातीतील मातंग, मांग, मिनीमादीग, दखनी- मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारुडी, मादगी, मादिगा या जातीतील संशोधक विद्यार्थ्यांकरिता ‘अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’ (एएसएनआरएफ) योजना राबविली जात आहे. कनिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती करिता 37 हजार तर वरिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी 42 हजार रुपये प्रतिमाह अधिछात्रवृत्ती दिली जाणार आहे. त्यानुसार आर्टी, मुंबई संस्थेमार्फत दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत पीएच. डी करिता कायम नोंदणी असणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांकडून पीएच. डी अधिछात्रवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 4 ऑगस्ट 2026 ते 3 सप्टेंबर 2026 या कालावधीत अर्ज करावे.

या योजनेचा सविस्तर तपशील, कालावधी, निवड पात्रता निकष, मार्गदर्शक सूचना आणि वेळापत्रक इत्यादी बाबतच्या माहितीकरिता आर्टी संस्थेच्या https://www.arti.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच संशोधक विद्यार्थ्यांनी https://fellowship.trti-maha.in या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशन, यूएसए संस्थाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

गरीब आणि मध्यमवर्गीयांना आरामदायी आणि उत्तम प्रवासाचा अनुभव देण्याला रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथेअरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस राज्यपालांकडून सिडनहॅम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप…

vishwatmaklokswamivarta

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी आरक्षण जाहीर*

vishwatmaklokswamivarta

वर्धा नदीवरील अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाई महसूलमंत्र्यांचे परिषदेत आश्वासन