vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची अंमलबजावणी गतिमान करावी – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची अंमलबजावणी गतिमान करावी – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई,  प्रतिनिधी : पुणे व मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्यात यावी. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महाप्रीत यांच्या माध्यमातून या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

या बैठकीस पुणे महाप्रीत चे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव चंद्रशेखर तरंगे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुणे व मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला

योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी सल्लागार संस्था निश्चित करुन पुढील कार्यवाही निश्चित करणे, सुरू असलेल्या योजनांचे सर्वेक्षण, क्षेत्रनिहाय तपशीलांचे परीक्षण तसेच क्षेत्र दुरुस्ती आणि दृश्य पडताळणी यांसह विविध तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक आणि गतिमान करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी, म्हाडा तसेच संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखून आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री मिसाळ यांनी दिल्या.

आवश्यक सर्वेक्षण पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा आणि विकासकामे निर्धारित कालमर्यादेत प्रभावीपणे पूर्ण होतील, यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवा – शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले

vishwatmaklokswamivarta

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींना शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी सुवर्णसंधी

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून मयताच्या वारसास महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिला दोन लाखाचा धनादेश..

vishwatmaklokswamivarta

वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या देशभरातील अनेक टोळ्या डीआरआयने आणल्या उघडकीस देशभरात संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये 440 हून अधिक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले किंवा संरक्षित वन्यजीव तसेच सुमारे 15 किलो हस्तिदंती वस्तू आणि हस्तिदंत जप्त; 33 जणांना अटक

vishwatmaklokswamivarta