vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून मयताच्या वारसास महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिला दोन लाखाचा धनादेश..

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून मयताच्या वारसास महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिला दोन लाखाचा धनादेश..

 

राज्य प्रतिनिधी-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही सर्वसामान्य जनतेसाठी मोलाची ठरत आहे. याच योजनेच्या माध्यमातून डोक्यावरचे छत हरवलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला जातो. अशाच पध्दतीने सावरगाव हडप येथील कैलासवासी परमेश्वर बाबासाहेब शिंदे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने दोन लाखाचा धनादेश सोमवार दि. 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता देण्यात आलाय.
सावरगाव हडप येथील रहिवासी कै. परमेश्वर बाबासाहेब शिंदे यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे त्याच्या वारसदार पत्नी सौ. मंगलबाई परमेश्वर शिंदे यांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या रामनगर शाखेने हा धनादेश प्रदान केलाय. दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक राहुल शिवाजीराव पवार यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आलाय. यावेळी बँक अधिकारी दादाराव जाधव, रोखपाल राजेश कोळेकर, कर्मचारी भिमराव आढाव, संतोष जाधव यांची उपस्थिती होती.
संकट काळात मदत करण्यासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही महत्वाची ठरते, त्यामुळे सर्वांनी या विमा योजनेचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेेचे व्यवस्थापक राहुल शिवाजीराव पवार यांनी केलंय.
00000

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य;जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धारावी भाजपाचे महा रक्तदान शिबिर संपन्न..

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा  

मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी/ कोळी बांधवाच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होणार नाही   – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य तिरंगा रॅलीला उपस्थितीयुवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल- मुख्यमंत्री