vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींना शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी सुवर्णसंधी

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींना शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी सुवर्णसंधी

 

जालना, प्रतिनिधी): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालूक्यात एक शासकीय निवासी शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेणे कठीण जाते. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यात शासकीय निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जालना जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलींसाठी जालना येथे, मुलांसाठी बदनापूर येथे तसेच भोकरदन येथे शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत.

या निवासी शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून प्रवेश दिला जातो. प्रत्येक शाळेत सुमारे 200 मुले-मुली शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही नियमानुसार जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार व पात्रतेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी या निवासी शाळांमध्ये विविध इयत्तांतील जागा रिक्त असून, पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रायगड जिल्ह्यात १८ मे अखेर ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा६४ गावे व २३० वाड्यांतील १ लाख १३ हजार ७०९ नागरिकांना दिलासा…

परवान्याशिवाय शेतमाल खरेदी-विक्री केल्यास कारवाई शेतमाल व्यापारासाठी परवाना घेणे बंधनकारक : पणन संचालकांचा इशारा

श्रीक्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखडा पुरातत्व विभागाच्या सूचनांनुसार विकास कामे करा-बी. वेणूगोपाल रेड्डी

मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta